हिवाळा सुरू झाला की भारताची राजधानी दिल्लीचा श्वास गुदमरू लागतो. या कालावधीत दिल्लीचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढतं.
नवी दिल्लीतील सर्वात उंच इमारत सिव्हिल सेंटरवरून टिपण्यात आलेली ही दिल्ली. ज्याचा फक्त फोटो पाहून गुदमरल्यासारखं होईल.
नासाच्या सॅटेलाइटमध्येही दिल्लीतील प्रदूषणाचं भयानक वास्तव कैद झालं आहे. ज्यात तुम्ही पाहू शकता दिल्लीवर धूरच धूर दिसतो आहे. नासाच्या सॅटेलाइटमधील 1 नोव्हेंबरचं हे चित्र आहे.
दिवाळीतील फटाक्यांचा धूर, गाडीचा धूर अशी दिल्लीतील या प्रदूषणागे कारणं आहेतच. पण आणखी एक वास्तव नासाच्या सॅटेलाइटमध्येही दिसून आलं आहे.
तुम्ही इथं पाहू शकता भारताच्या उत्तरेकडे लाल रंगाचे बिंदू दिसत आहेत. हे बिंदू म्हणजे जिथं शेतातील कचरा किंवा पिकांचे अवशेष जाळले जातात.
या कालावधीत मुख्यतः पंजाब, हरयाणा इथले शेतकरी शेतातील पिकांचे अवशेष किंवा कचरा जाळून त्यांची विल्हेवाट लावतात. गेल्या काही दिवसातील आकडेवारी पाहिली तरी ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये शेतातील आगीची प्रकरणं वाढलेली आहेत.
या शेत जाळण्याच्या प्रकरणामुळे दिल्लीतील प्रदूषणही वाढलं आहे. ऑक्टोबर महिन्यात 10 टक्क्यांच्या आत असलेले दिल्लीचं प्रदूषण नोव्हेंबरमध्ये 34 टक्क्यांवर पोहोचलं आहे.