जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अमित ठाकरेंना पाहण्यास आले अन् मोबाईल गायब झाले, चोराने कार्यकर्त्याचे पैसेही लांबवले

अमित ठाकरेंना पाहण्यास आले अन् मोबाईल गायब झाले, चोराने कार्यकर्त्याचे पैसेही लांबवले

 अज्ञात चोरटे कार्यकर्त्यांमध्ये घुसले यात मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांचा 45 हजार रुपयांचा मोबाईल लंपास केला.

अज्ञात चोरटे कार्यकर्त्यांमध्ये घुसले यात मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांचा 45 हजार रुपयांचा मोबाईल लंपास केला.

अज्ञात चोरटे कार्यकर्त्यांमध्ये घुसले यात मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांचा 45 हजार रुपयांचा मोबाईल लंपास केला.

  • -MIN READ
  • Last Updated :

बीड, 14 ऑक्टोबर : महापालिका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तोंडावर मनसेकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव मनसे नेते अमित ठाकरे हे महाराष्ट्रभर दौरा करत आहे. पण, बीडमध्ये अमित ठाकरेंच्या दौऱ्यामध्ये चोरांची चांदी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले आहे. अमित ठाकरे बीडच्या परळी शहरात आले असता परळीतील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचेजंगी स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांध्ये चोरांनी घुसत मनसे जिल्हाध्यक्षासह इतर दोघांचे मोबाईल लंपास करत अनेकांचे खिसे कापले. विशेष म्हणजे, सीसीटीव्ही असताना पोलिसांना या चोरांचा अद्याप तपास लागलेला नाही. (पोलीस स्टेशनसमोरच झोपले खडसे, 16 तासांपासून आंदोलन सुरूच, काय आहे प्रकरण?) अज्ञात चोरटे कार्यकर्त्यांमध्ये घुसले यात मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांचा 45 हजार रुपयांचा मोबाईल लंपास केला. तर माणिक लटिंगे यांचा 18 हजार रुपयांचा आणि इतर एकाचा असे तीन मोबाईल लंपास केले आहे. तर गंगाखेड येथील एका कार्यकर्त्याच्या खिशातील 50 हजार रुपये चोरट्याने गायब केले आहे. मोबाईल आणि रोख रक्कम चोरीला गेल्यामुळे मनसेचे कार्यकर्त्यांची चांगलीच पंचाईत झाली. या प्रकरणी कार्यकर्त्यांनी लगेच मोबाईल चोरी प्रकरणी राजेंद्र मोटे आणि माणिक लटिंगे यांनी संभाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ( Andheri East Bypoll : शिदेंचं एक पाऊल मागे, शिवसेनेशी थेट टक्कर टळली, पण… )_ याआधीही राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा पार पडली होती. या सभेत नांदेडमधील मनसेच्या नेत्याचे सोन्याची साखळी आणि लॅकेट चोराने लंपास केले होते. पोलिसांनी तपास करून चार महिन्यानंतर चोराचा शोध लावला आणि सोन्याची साखळी शोधून काढली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात