वसई 20 नोव्हेंबर : वसईमधून आगीची एक घटना नुकतीच समोर आली आहे. यात भुईगांव ब्रम्हपाडा येथे एका घराला आग लागली. ही आग इतकी भीषण होती की काही वेळात संपूर्ण घर जळून खाक झालं. घराला आग लागली त्यावेळी वृद्ध दाम्पत्य घरामध्येच होतं. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीत घर बेचिराख झालं आहे.
भंडारा: घरात घुसून मुलीला मारहाण करत गाठला क्रूरतेचा कळस; अखेर 5 वर्षांनी आरोपीला घडली अद्दल
घरात आग लागली तेव्हा काशीनाथ लक्ष्मण निजाई (वय ८०) आणि पार्वतीबाई काशीनाथ निजाई (वय ७५) हे दोघे आतमध्येच होते. दोघेही या झोपडी वजा घरात गेली 50 वर्षांपासून राहत होते. रात्री ३ च्या सुमारास अचानक आग लागली. यानंतर अंगाला चटका लागल्यावर या दोघांनाही जाग आली. झोपेत असताना अचानक घडलेल्या या घटनेनं ते घाबरले.
यानंतर हे दाम्प्तय कसेबसे घरातून बाहेर पडले. ही बाब लक्षात येताच आजूबाजूच्या लोकांनी इथे येत आग विझवण्यासाठी पाणी मारलं. मात्र आग आटोक्यात आली नाही. शेवटी वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी याठिकाणी धाव घेतली.
कारची एकच धडक, ट्रॅक्टरचे झाले 3 तुकडे, 2 चिमुरडे थोडक्यात बचावले, VIDEO
तब्बल 4 तासांनंतर ही आग विझवण्यात यश आलं. या आगीत संपूर्ण घर बेचिराख झालं आहे. मात्र, सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग नेमकी कशाने लागली हे समजू शकलं नाही. या दाम्पत्याला मूलबाळ नसल्याने शासनाने त्यांना मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.