नेहाल भुरे, भंडारा 20 नोव्हेंबर : भंडाऱ्यातून काही वर्षांपूर्वी अतिशय धक्कादायक घटना समोर आली होती. याप्रकरणी न्यायालयाने आता आरोपीला शिक्षा सुनावली आहे. या घटनेत तरुणाने घरी एकट्या असलेल्या अल्पवयीन गतिमंद मुलीला मारहाण करून रॉकेल ओतून पेटवण्याची धमकी दिली होती. या तरुणाला आता भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार, विद्यार्थिनीचा प्राध्यापकावर आरोप; घटनेने खळबळ नानेश्वर विठोबा राऊत (35) रा. मोहरणा असं शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील मोहरणा येथे 27 मे 2017 रोजी घडली होती. अल्पवयीन गतिमंद मुलगी घरी एकटी होती. तिची आई शेतातून घरी आली तेव्हा मुलगी जोरजोराने रडत असल्याचं दिसून आलं. तिला याबाबत विचारलं असता तिने नानेश्वर राऊत याने घरात प्रवेश करून आपल्याला मारहाण केल्याचं तसंच अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्याची धमकी दिल्याचं सांगितलं. मुलीने याबाबत माहिती देताच लाखांदूर पोलीस ठाणे गाठून तक्रार देण्यात आली. पोलिसांनी भादंवि 354 अ (2) 451, 323 सह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा गांभीर्याने तपास करत पोलिसांनी नानेश्वर राऊत याला अटक केली. साक्षीपुरावे गोळा करून आरोपपत्र प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. धक्कादायक! आधी लग्नाचे आमिष नंतर अत्याचार, धर्मांतरासाठी तरुणीवर दबाव टाकणाऱ्या आरोपीला बेड्या याप्रकरणी आता अतिरिक्त व सत्र न्यायाधीश पी. बी. तिजारे यांनी साक्षी पुराव्याअंती आरोप सिद्ध झाल्याने नानेश्वर राऊत याला शिक्षा सुनावली आहे. आरोपीला पाच वर्ष सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.