जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Bhiwandi Accident : सांगा याला जबाबदार कोण? भिंवडीत खड्यांमुळे 2 जिवलग मित्रांचा मृत्यू

Bhiwandi Accident : सांगा याला जबाबदार कोण? भिंवडीत खड्यांमुळे 2 जिवलग मित्रांचा मृत्यू

Bhiwandi Accident : सांगा याला जबाबदार कोण? भिंवडीत खड्यांमुळे 2 जिवलग मित्रांचा मृत्यू

नॅशनल पार्क फ्लायओव्हरवर दोन दुचाकीस्वारांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. डंपर क्रमांक (MH 02 ER 5461) राष्ट्रीय उद्यान उड्डाणपुलावरून मीरा रोडच्या दिशेने जात होता. (Bhiwandi Accident)

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 18 ऑगस्ट :  नॅशनल पार्क फ्लायओव्हरवर दोन दुचाकीस्वारांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. डंपर क्रमांक (MH 02 ER 5461) राष्ट्रीय उद्यान उड्डाणपुलावरून मीरा रोडच्या दिशेने जात होता. डंपर चालक सलीम शेख याला कस्तुरबा पोलिस स्टेशन, बोरिवली पूर्व यांनी अटक केली आहे. यामध्ये दोन मित्रांचा अपघात झाला आहे. तरुणांच्या दुचाकीला भयंकर अपघात झाल्याने घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला आहे.

जाहिरात

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे नॅशनल पार्क ब्रिजवर खड्ड्यामध्ये पडून दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. मागून येणाऱ्या डंपरने त्यांना चिरडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान या अपघातामुळे नागरिकांनी खराब रस्त्यांबाबत संताप व्यक्त केला.

अवघ्या काही तासात शहरातील दुसरी घटना

भिवंडी शहरातील  राजीव गांधी उड्डाणपुलावरून (rajiv gandhi bridge bhiwandi) भरधाव वेगात जाणाऱ्या तरुणांची दुचाकी 25 फूट खाली पडून दोन तरुण  गंभीर जखमी झाले आहे. जखमी तरुणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भिवंडी शहरातील जकात नाका येथील राजीव गांधी उड्डाणपुलावर ही घटना घडली. सुसाट वेगात आलेल्या दुचाकीची पुलाच्या कठड्याला धडक बसल्याने दोन तरुण पुलावरून थेट 25 फूट खाली पडल्याने गंभीर जखमी झाले आहे.  

शंकर पवार, सादाब शेख, इरफान अंसारी असं जखमी झालेल्या तरुणांची नाव आहे. हे तिघे ठाकूर पाडा इथं वाढदिवसाची पार्टी करून स्कुटी वरून वेगात येत होते. शंकर पवार, सादाब शेख हे दोघे खाली पडले मात्र इरफान अंसारी हा पुला वरतीच पडल्याने तो पळून गेला आहे.

हे दोन्ही तरूण खाली पडल्याचे कळाल्यावर त्याच ठिकाणी दहीहंडीचा सराव करणाऱ्या तरुणांनी धाव घेऊन दोघांना इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ठाणे येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

जाहिरात

धक्कादायक बाब म्हणजे, शहरातील या अगोदर वंजारपट्टी नाका इथं दुचाकीस्वार खाली पडून मृत्युमुखी पडला होता. तर कल्याण रोड वरील स्वर्गीय  बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावरून एक  तर राजीव गांधी उड्डाणपुलावरून दुचाकी स्वार  पडल्याच्या दोन घटना अशा आतापर्यंत चार घटना  घडल्या आहेत. त्यामुळे या तिन्ही उड्डाणपुलाचे कठड्यांची उंची  लहान असल्याने असे चार अपघात घडल्याने यांची उंची वाढवण्याची मागणी नागरिक करीत आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  चुकीच्या रेल्वेत चढले म्हणून प्लॅटफॉर्म मारली उडी, डोके आणि हात चालले होते रेल्वेखाली, पण…LIVE VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात