जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / संसार सुरू होण्याआधीच काळानं घात केला, देवदर्शनाहून परतणाऱ्या कुटुंबाचा अपघात

संसार सुरू होण्याआधीच काळानं घात केला, देवदर्शनाहून परतणाऱ्या कुटुंबाचा अपघात

कारचा भीषण अपघात

कारचा भीषण अपघात

मुंबईच्या दिशेनं येताना 13 किलोमीटरवर पनवेल जवळ सफारी गाडी 50 फूट खोल रस्त्याच्या कडेला कोसळली.

  • -MIN READ Panvel,Raigad,Maharashtra
  • Last Updated :

पनवेल, प्रतिनिधी प्रमोद पाटील : लग्न झालं आणि सुखी संसारची सुरुवात करण्याआधी देवदर्शन करायला कुटुंब निघालं. देवदर्शनही नीट पार पडलं पण घरी परतताना काळानं घात केला. हसत्या खेळत्या कुटुंबाला दृष्टं लागली आणि होत्याचं नव्हतं झालं. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात झाला. मुंबईच्या दिशेनं येताना 13 किलोमीटरवर पनवेल जवळ सफारी गाडी 50 फूट खोल रस्त्याच्या कडेला कोसळली. अपघात सकाळी 10 च्या दरम्यान झाला असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात एका जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना स्थनिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. 28 तारखेला मुलाचं लग्न झालं होत देवदर्शन नंतर कुटुंब मुंबई कडे परतत असताना झाल्याचं सांगितलं जात आहे.

News18लोकमत
News18लोकमत

समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; कार थेट 30 फुट खाली कोसळली, भयानक PHOTOS धडस कुटुंब अहिल्याबाई होळकर नगर, विक्रोळी वेस्ट भागात राहात असल्याची माहिती मिळाली आहे. लग्न झालं घरात आनंदाचं वातावरण होतं. सगळे देवदर्शनासाठी गेले. सुखरुप सगळं पार पडलं खरं मात्र घरी परतताना काळानं घात केला. त्यामुळे धडस कुटुंबावर शोककळा पसरली आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशीच गुरुचा हात हरपला; 2 शिक्षकांच्या मृत्यूने अख्खं गाव हळहळलं! मुंबई -पुणे द्रुतगती महामार्ग  वरून मुंबई बाजूकडे जात असताना असता त्यांचे ताब्यातील कार भरधाव वेगात असल्याने स्लीप होऊन कार वरील ताबा सुटल्याने कार शोल्डर लेनच्या रेलिंग ला ठोकर मारून रोडचे  डावे बाजूस  पलीकडे खाली खड्ड्यात  जाऊन पलटी मारून  अपघात झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात