संभाजीनगरहून जालनाच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे कार मार्गाच्या डाव्या बाजूला जवळपास 30 फूट खोल कोसळली.
अपघातात सुशीलकुमार थोरात यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ते वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील रहिवासी आहेत.
त्यांच्यासोबत चार चाकीमध्ये असलेली त्यांची पत्नी व बाळ या अपघातात जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी संभाजीनगर येथे पाठवण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. समृद्धी महामार्गावर रोजच अपघात होऊन प्रवासी मृत्यूमुखी पडत आहेत.
बुलडाणा येथील भीषण बस अपघातानंतर आज सलग तिसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावर अपघात झाला आहे. अपघाताची ही मालिका सुरुच असल्याचे दिसत आहे.