मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Mumbai Municipal : मुंबईची होणार नाही आता तुंबई, नालेसफाईसाठी आता अत्याधुनिक रोबोटिक मशीन

Mumbai Municipal : मुंबईची होणार नाही आता तुंबई, नालेसफाईसाठी आता अत्याधुनिक रोबोटिक मशीन

मुंबईत नालेसफाईसाठी वापरणार अत्याधुनिक रोबोटिक मशीन, बीएमसी करणार 180 कोटींचा खर्च

मुंबईत नालेसफाईसाठी वापरणार अत्याधुनिक रोबोटिक मशीन, बीएमसी करणार 180 कोटींचा खर्च

मुंबई प्रत्येक पावसाळ्यात तुंबते. या समस्येवर मात करण्यासाठी व मुंबईतील नाले स्वच्छ करण्यासाठी बीएमसी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 09 फेब्रुवारी : मुंबई प्रत्येक पावसाळ्यात तुंबते. या समस्येवर मात करण्यासाठी व मुंबईतील नाले स्वच्छ करण्यासाठी बीएमसी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. यासाठी रोबोटिक मल्टिपर्पज एस्केव्हेटर मशीनचा वापर करण्यात येणार आहे. या आधुनिक रोबोटिक मशीनवर सुमारे आठ कोटी रुपये खर्च होतील. या संदर्भात ‘नवभारत टाइम्स’ने वृत्त दिलंय.

बीएमसीच्या सर्व विभाग कार्यालयांच्या मागणीनुसार स्टॉर्म वॉटर ड्रेन लाइन्सच्या साफसफाईसाठी विविध प्रकारची मशीन उपलब्ध करून दिली जातात. मुंबई शहर, पश्चिम उपनगरं आणि पूर्व उपनगरांत अनेक उघडे नाले असून, त्यात कचरा, सामान, प्लॅस्टिक अशा वस्तू असतात. त्यामुळे पावसापूर्वी या सर्वांची साफसफाई केली जाते. उघड्या नाल्यांच्या सफाईसाठी विदेशी बनावटीचे रोबोटिक मल्टिपर्पज एस्केव्हेटर मशीन वापरले जाते. याचा वापर नाले सफाईसाठी केला जातो.

हे ही वाचा : मुंबई, ठाणे प्रवास होणार वेगवान; वाढदिवशी मुख्यमंत्र्यांचं ठाणेकरांना मोठं गिफ्ट

हे रोबोटिक मशीन आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे. त्याची दुरुस्ती करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासोबतच पुढील चार वर्षांसाठी दुरुस्ती व देखभालीची जबाबदारीही कंत्राट घेणाऱ्या कंपनीला देण्यात येणार आहे. मशीन आल्यानंतर नाल्यांच्या साफसफाईला वेग येईल, असं म्हटलं जातंय.

क्रेनची गरज नाही

हे रोबोटिक मल्टिपर्पज एस्केव्हेटर तीन मशीनचं म्हणून काम करते, ज्यामध्ये जेसीबी, पोकलेन आणि ड्रेजरचा समावेश असतो. एक व्यक्ती त्याच्या एका कॉकपिटमध्ये बसून मशीन नियंत्रित करते. सर्व काम मशीन करतं. त्यामुळे गाळ उचलून बाहेर टाकण्यासाठी क्रेनची गरज भासत नाही. या मशीनचा वापर भार उचलण्यासाठी, रस्ते खोदण्यासाठी आणि झाडं तोडण्यासाठी केला जाऊ शकतो. मशीनचा स्पीड इतका आहे की ते ऑपरेट करण्यापूर्वी कोणतीही व्यवस्था करण्याची आवश्यकता नाही.

हे ही वाचा : मुंबईत घर घेताय तर थांबा! वसईत 50 लाखांना फसवणारा पोलिसांच्या जाळ्यात

पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचं लक्ष्य

बीएमसीने नाले सफाईसाठी 180 कोटी रुपयांची 6 टेंडर काढली आहेत. जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 30 कोटी रुपयांनी जास्त आहेत. गेल्या वर्षी बीएमसीने नाले सफाईसाठी 150 कोटी रुपयांची टेंडर काढली होते. यंदा पावसाळ्यापूर्वी 80 टक्के नाले सफाईचं उद्दिष्ट पालिकेने ठेवलं आहे. मुंबईत पाणी साचू नये, यासाठी लहान-मोठे नाले, मुंबईतील स्टॉर्म वॉटर ड्रेनेज लाइन साफ करण्याची कामे कंत्राटदार करणार आहेत.

पावसाळ्यात समुद्रातील उंच लाटांमुळे मुंबईच्या बहुतांश भागांमध्ये स्टॉर्म वॉटर ड्रेनेज लाइन्समुळे पाणी बाहेर पडत नाही. सखल भागात पाणी साचतं. यासाठी बीएमसी दरवर्षी शेकडो कोटी रुपये नाल्यांच्या सफाईसाठी खर्च करते. परंतु, नाल्यांची सफाई वेळेत होत नाही आणि त्यातून कचराही काढला जात नाही, त्यामुळे मुसळधार पावसात अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण होते.

First published:

Tags: Mumbai, Mumbai muncipal corporation, Mumbai News, Mumbai rain