मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मुंबई, ठाणे प्रवास होणार वेगवान; वाढदिवशी मुख्यमंत्र्यांचं ठाणेकरांना मोठं गिफ्ट

मुंबई, ठाणे प्रवास होणार वेगवान; वाढदिवशी मुख्यमंत्र्यांचं ठाणेकरांना मोठं गिफ्ट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोपरी पुलाचं उद्घाट करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोपरी पुलाचं उद्घाट करणार

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढिदवस आहे. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी त्यांच्या हस्ते ठाण्यातील कोपरी पुलाचे उद्घाटन होणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Thane, India

ठाणे, 9 फेब्रुवारी : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढिदवस आहे. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी त्यांच्या हस्ते ठाण्यातील कोपरी पुलाचे आज उद्घाटन होणार आहे. हा ठाणे आणि मुंबईला जोडणारा महत्त्वाचा पूल आहे. अनेक वर्ष ठाणेकर या पूल उद्घाटनाच्या प्रतिक्षेत होते. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी ठाणेकरांना आज ही खास भेट मिळणार आहे. हा पूल वाहतुकीसाठी सुरू झाल्यानंतर ठाण्याकडून मुंबईच्या दिशेने जाताना होणारी वाहतूक कोंडी कायमची दूर होणार आहे. ठाणेकरांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.

दोन टप्प्यांत पुलाचं काम  

ठाणे -मुंबईला जोडणाऱ्या कोपरी पुलाचं काम पूर्ण झाले आहे. आज या पुलाच्या उर्वरित दोन मार्गिका नागरिकांसाठी खुल्या करण्यात येणार आहेत. ठाणेकरांच्या दृष्टीनं हा पूल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात 'एमएमआरडीए' ने कोपरी पुलाच्या बांधकामास 2018 ला सुरुवात केली होती. हा पूल दोन टप्प्यात आठ पदरी करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात दीड वर्षांपूर्वी या पुलाच्या दोन मार्गिका तयार झाल्या. त्यानंतर एमएमआरडीएने मुख्य पुलाचे काम हाती घेतले होते. हा पूल उद्घाटनासाठी सज्ज झाला असून, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोपरी पुलाचं उद्घाटन होणार आहे.

वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

हा पूल ठाणे आणि मुंबईला जोडणारा महत्त्वाचा पूल आहे. या भागात कायमच वर्दळ असते. ठाणेकर गेले अनेक वर्ष या पूलाच्या प्रतिक्षेत होते. आता हा आठ पदरी पूल झाल्यामुळे ठाण्याकडून मुंबईच्या दिशेने जाताना जी वाहतूक कोंडी होत होती ती होणार नाही. वाहतूक सुरळीत सुरू झाल्यानं ठाण्यातून मुंबईला जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेत बचत होणार आहे.

First published: