विजय देसाई(मुंबई) 09 फेब्रुवारी : वसई विरारमध्ये स्वस्त घराचे स्वप्न दाखवून फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे भासवून सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणारा एका भामट्याला पोलिसांनी अटक केली आहे. या भामट्याने तब्बल 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील वसई, विरार परिसरात गेल्या काही महिन्यापासून स्वस्त दरात फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असल्याची जाहिरात देण्यात येत आहे. दरम्यान ही जाहिरात देऊन सर्वसामान्य नागरीकांची आर्थिक फसवणुक करणारी टोळी सक्रीय झाली होती. त्या अनुषंगाने फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदर फसवणुकीच्या गुन्हयांना आळा घालण्यासाठी आदेश देण्यात आले होते.
हे ही वाचा : Nashik Koyta Gang : बहिणीची छेड, जाब विचारायला गेलेल्या तरुणासोबत भयानक कृत्य; नाशिकमध्येही कोयता गँगची दहशत
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे सापळा रचण्यात आला होता. या गुन्हयातील मुख्य आरोपी रामसिंग जालमसिंग देवरा (वय 28) याला ताब्यात घेवून चौकशी करण्यात आली. स्वस्त दरात घर विकत घेऊ इच्छीणाऱ्या सर्वसामान्य नागरीकांना हेरुन त्यांची 50 लाख रुपयांची फसवणुक केले असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान या व्यक्तीवर अर्नाळा पोलीस ठाण्यात तीन गुन्हे तर नालासोपारा पोलीस ठाण्यात 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान या व्यक्तीस न्यायालयात हजर केले असता त्याचा ताबा अर्नाळा पोलिसांकडे देण्यात आला आहे. पुढील तपास अर्नाळा पोलीस करीत आहेत.
हे ही वाचा : 'ओ शेठ'ला दिला 'साहेबांनी' चोप, मोफत सूपच्या ऑफरवरून पुण्यात तुफान राडा
या प्रकरणात पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, अमोल मांडवे, यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. प्रमोद बडाख, पो.उप निरी. उमेश भागवत, शंकर शिंदे, अशोक पाटील, सचिन घेरे, सागर बारावकर, मनोज सकपाळ, अश्विन पाटील, पो.अं. राकेश पवार, सुमित जाधव, मसुब प्रविण वानखेडे, सागर सोनवणे यांनी कारवाई केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fraud, Money fraud, Mumbai, Mumbai police