नागपूर हायकोर्टाचा तुकाराम मुंढे यांच्यासह निलंबित आरोग्य अधिकाऱ्याला दणका

नागपूर हायकोर्टाचा तुकाराम मुंढे यांच्यासह निलंबित आरोग्य अधिकाऱ्याला दणका

नागपूर महापालिकेनं सील केलेल्या एलेक्सिस रुग्णालय प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं शुक्रवारी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि आरोग्य अधिकारी डॉ. गंटावार यांना दणका दिला.

  • Share this:

नागपूर, 24 जुलै: नागपूर महापालिकेनं सील केलेल्या एलेक्सिस रुग्णालय प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं शुक्रवारी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि आरोग्य अधिकारी डॉ. गंटावार यांना दणका दिला. ही कारवाई बेकायदा आहे, अशा शब्दांत खंडपीठानं ताशरे ओढले आहेत, तसेच रुग्णालयातील सोनोग्राफी मशिन्सचं सील काढण्यात यावे.

ही मशीन त्वरित सोडावी, अन्यथा रुग्णालयाला दिवसाला 50 हजार रुपये महिना नुकसान भरपाई देण्याचेही आदेश खंडपीठानं दिले आहे.

हेही वाचा...शरद पवार म्हणाले, देशावर मोठं संकट! देवेंद्र फडणवीस आणि भाजपने राजकारण करू नये

भाजप नगरसेवकानं व्यक्त केलं समाधान...

नागपूर खंडपीठाच्या या निर्णयावर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. डॉ. गंटावार यांनी यांच्या कारवाई संदर्भात जे आक्षेप घेतले होते ते खरे असल्याचं सिद्ध झाल्याचं नगरसेवक तिवारी यांनी म्हटलं आहे. असं असलं तरी डॉ. गंटावार यांना आयुक्त निलंबित का करत नाही, असा सवाल तिवारी यांनी उपस्थित केला आहे. एकतर डॉ. गंटावार यांना आयुक्त तुकाराम मुंढे यांचा अभय आहे. नाहीतर तुकाराम मुंढे हे देखील या प्रकरणात सहभागी आहेत, असा आरोपही नगरसेवक तिवारी यांनी केला आहे.

दुसरीकडे, नागपूर महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपविरुद्ध प्रशासन या वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने आयुक्त तुकाराम मुंढे यांना नोटीस बजावली आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पातून सात जणांना नोकवरीवरुन काढून टाकलं होतं. पण तुकाराम मुंढे स्वत: स्मार्ट सिटीचे नियमानुसार सीईओ झाले नव्हते. मग त्यांनी सात कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कसं काढलं? अशाप्रकारची याचिका सात कर्मचाऱ्यांनी नागपूर खंडपीठात दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना तुकाराम मुंढे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. 15 दिवसांत त्यांना यावर उत्तर द्यायचं आहे, अशी माहिती याचिकाकर्त्यांचे वकील श्रीरंग भांडारकर यांनी दिली आहे.

दरम्यान, तुकाराम मुंढे यांना दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस पाठवली आहे. महापालिकामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मानसिक छळ होत असल्याचं एका महिला अधिकारीनं महिला आयोगाला दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

हेही वाचा...रिअल हिरोकडून मदतीचा ओघ सुरूच! सोनू सूद आता करणार त्या वॉरिअर आजीची मदत

भाजपनं केला गंभीर आरोप....

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर महापालिकेतील सत्ताधारी भाजपनं भ्रष्टाचाराचा आणखी एक गंभीर आरोप केला आहे. 'सी डॅट' कंपनीला चुकीच्या पद्धतीनं कंत्राट दिलं, स्मार्ट सिटी कंपनीचं काम करणाऱ्या एल & टी कंपनीवर दबाव आणून सी डॅट कंपनीला 2 कोटी 80 लाखांचे बेकायदा काम देण्यास दबाव आणला, असा आरोप मनपाच्या विधी समितीचे सभापती धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: July 24, 2020, 7:03 PM IST

ताज्या बातम्या