चंद्रकांत बनकर, 18 ऑक्टोबर : मुंबई गोवा महामार्गावर अपघाताचा महामार्ग बनत चालला आहे. आज (दि.18) अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. यामध्ये चार वाहनांचा अपघात झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भोस्ते घाटातील अवघड वळणावर हा अपघात झाला. यामध्ये ट्रकने एसटी बस, दोन दुचाकी ,आणि महिंद्रा पिकअप अशा चार वाहनांना धडक दिली आहे. हा ट्रक इतका भरधाव वेगात होता यामुळे संरक्षण भिंतीला जोरदार ठोकर देत थांबला.
मिळालेल्या माहितीनुसार, गोव्याकडून मुंबईकडे येणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात आज (दि.18) झाला. यामध्ये ट्रकने चार वाहनांना ठोकर दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भोस्ते घाटात झालेल्या अपघातात ट्रकने एसटी बस, दोन दुचाकी ,आणि महिंद्रा पिकअप अशा चार वाहनांना धडक दिली आहे. हा ट्रक इतका भरधाव वेगात होता यामुळे संरक्षण भिंतीला जोरदार ठोकर देत थांबला.
हे ही वाचा : गोवा-हैदराबाद विमानात अचानक धुराचे लोट; Emergency लँडिंग, धक्कादायक VIDEO
या भीषण अपघातामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. तर अपघातानंतर महामार्गावरती सगळीकडे ऑइल पसरल्यामुळे अनेक वाहने घसरत आहेत. गेल्या एक तासापासून एकेरी मार्ग सुरू असल्याने ट्राफीकचा बोजवार उडाला, दरम्यान भोसले घाटातून हळुहळु ही वाहतुक सुरू आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत तात्काळ उपाययोजना केली.
दरम्यान मागच्या काही काळात मुंबई -गोवा महामार्गावरील भुसते घाट हा मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या घाट मार्गावर भीषण अपघात होत आहेत. गेल्या महिनाभरात चार ते पाच भीषण अपघात देखील याच ठिकाणी झाले असल्याची माहिती मिळाली आहे.
ही सर्व वाहने गोव्याहून मुंबईच्या दिशेने येत होती भोसले घाट उतरत असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने पहिल्यांदा दोन दुचाकींना ठोकर दिली. त्यानंतर समोर चाललेल्या एसटी बसला ठोकर देऊन समोरील महिंद्रा पिकप या गाडीला पाठीमागून ठोकर दिली. हा अपघात इतका भीषण होती की महिंद्रा पिकअप गाडी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पलटी झाली.
हे ही वाचा : सुसाट स्कॉर्पिओ झाली आऊट ऑफ कंट्रोल, पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळली
दरम्यान या धडकेत ऑईल महामार्गाच्या परिसरात पसरले होते यामुळे वाहनांची तारांबळ उडाली. या विचित्र अपघातामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले असल्याचे सांगण्यात येते. सर्व जखमींना खेडमधील लवेल या ठिकाणी असणाऱ्या घरडा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. अपघात झाल्यानंतर महामार्गावरती सर्वत्र ऑइल पसरल्यामुळे अनेक अवजड वाहने आणि लहान वाहने देखील घसरत होते त्यामुळे महामार्गावरील एक बाजू बंद करून एकेरी वाहतुकीला सुरुवात केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Container accident, Major accident, Ratnagiri