महेश तिवारी, 18 ऑक्टोबर : चंद्रपूर जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर भीषण अपघात झाला आहे. चंद्रपूरहून आष्टीकडे जाणारी स्कॉर्पीओ वैनगंगा नदीच्या कठड्याला धडकून नदी पात्रात गेल्याने चालकाचा मृत्यू झाला. ही घटना काल संध्याकाळी 6 च्या सुमारास घडली. दरम्यान वैनंगगा नदी पात्रात पाणी भरपूर असल्याने वाहन नदीत कोसळल्यानंतर पाण्यात पूर्णपणे बुडाले. मृत चालकाला नदी पात्राबाहेर काढण्यात यश आले असले तरी त्यांची अद्यापही ओळख पटलेली नाही. हा अपघात झाल्यानंतर दोन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प होती.
मिळालेल्या माहितीनुसार, आष्टी गोंडपिंपरी मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावरून भरधाव वेगातील स्कार्पिओ वाहन थेट वैनगंगा नदीत कोसळले. यामधील वाहनचालकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास घडली. गोंडपिपरी येथून आष्टीकडे (एम. एच. 20 डिव्ही 3711) या क्रमांकाची स्कार्पिओ वाहन जात होते. भरधाव वेगात असलेले वाहन आष्टीजवळील वैनगंगा नदीच्या पुलावरून थेट नदीत कोसळले. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन नदीत कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा : ओव्हरटेक जीवावर बेतले, भरधाव बस ट्रकवर आदळली, 6 जण ठार
यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला. मात्र अद्याप हे वाहन कोणाचे आहे, वाहन चालक कोण याबाबतची माहिती मिळू शकली नाही. याबाबत अधिक माहितीनुसार, गाडीमध्ये चालक एकटाच होता. अपघाताची माहिती आष्टी व गोंडपीपरी पोलीसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत वाहन नदीतून बाहेर काढण्याचे काम सुरू होते.
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघात, वाहतूक खोळांबली
पुणे ,मुंबई एक्सप्रेसवेवर खोपोली एक्जिटजवळ मुंबईकडे जाणाऱ्या ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. मुंबईकडे जाणार ट्रक अचानक पुणे लेनवर गेल्याने मुंबईवरून पुण्याकडे जाणाऱ्या टँकरला धडकून उलटला. हा अपघात आज (दि.18) पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास घडला, यात कोणतीच जीवित हानी झाली नाही.
हे ही वाचा : संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा सौम्य झटका, उपचारासाठी मुंबईला विमानाने रवाना
मात्र या अपघाताने पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. ही घटना घडल्यानंतर एक लेन बंद करून काही काळ तातडीने पुण्याकडे जाणाऱ्या दोन मार्गिका सुरू केल्या होत्या, तसेच घाट क्षेत्रातील वाहतूक पूर्व पदावर येण्यास काही वेळ लागण्याची शक्यता असल्याचे वर्तवण्यात आलं आहे. हा अपघात घडल्यानंतर ट्रक चालक पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान टँकरला जोरात धडक बसल्याने टँकरमधील ऑइल रस्त्यावर सांडल्याने वाहतूक धिम्यागतीने सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chandrapur, Khalapur accident, Major accident, चंद्रपूर chandrapur