मुंबई, 18 ऑक्टोबर : मागच्या काही काळात विमान दुर्घटनेत वाढ होताना दिसत आहे. विमान अचानक लँडिंग करण्याच्या घटनामंध्ये वाढ झाली आहे. मागच्या 1 वर्षांत तब्बल 10 ते 11 वेळा विमान काही कारणामुळे तात्काळ लँडिंग करण्याची वेळ आली आहे. दरम्यान काल (दि.17) अशीच एक घटना घडली आहे. गोव्याहून हैदराबादला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाच्या केबिनमध्ये अचानक धुराचे लोट आल्याने विमान हैदराबाद विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. दरम्यान याचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. दरम्यान याबाबत एअर लाईन कर्मचाऱ्यांनी प्रवाशांवर दबाव टाकत व्हिडिओ डिलीट करण्यास भाग पाडले.
विमानात अचानक धुराचे लोट आल्याने प्रवाशांनी आपल्या फोनमध्ये व्हिडिओ आणि फोटो काढण्यास सुरू केले. यानंतर विमानातील केबीन क्रूने प्रवाशांकडून फोन हिसकावून घेण्यास सुरुवात केली. उलट विमानातील कर्मचारी प्रवाशांना धिर देण्याचे सोडून प्रवाशांना भिती घालण्यात आल्याचा प्रकार घडल्याचे दिसून आल्याचे प्रवाशांनी माहिती दिली. या सगळ्या घटनेत विमानाचे लँडिग सेफ झाल्यनंतर प्रवाशांना इमर्जन्सी एक्झिटमधून खाली उतरवण्यात आले.
Finally, a video has emerged of the @flyspicejet flight where smoke filled the cabin.
— Tarun Shukla (@shukla_tarun) October 16, 2022
And "airline staff forced us to delete videos and photos of the incident. They snatched my phone when I refused."
Via passenger @VivekVi97433075 @DGCAIndia @MoCA_GoI @FAANews @icao pic.twitter.com/f9hnVop5Zo
हे ही वाचा : ओव्हरटेक जीवावर बेतले, भरधाव बस ट्रकवर आदळली, 6 जण ठार
डीजीसीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, विमानात उतरताना एका प्रवाशाच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. हैदराबाद विमानतळाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, Q400 विमान VT-SQB मध्ये 86 प्रवासी होते आणि आपत्कालीन परिस्थितीमुळे रात्री 11 वाजताच्या सुमारास घडलेल्या घटनेनंतर 9 विमानांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याचे ते म्हणाले.
विमानात नेमका बिघाड कसा झाला ?
विमान अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार इंजिनच्या ब्लीड-ऑफ व्हॉल्व्हमध्ये इंजिन ऑइलचा बिघाड झाल्याची दिसून आले आहे. यामुळे विमानातील एअर कंडिशनिंग सिस्टममध्ये तेल गेले. याचा परिणाम होऊन केबिनमध्ये धूर निघत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.
विमानाच्या इंजिन ऑईलमध्ये मेटल आणि कार्बन कणांचा समावेश झाला आहे का हे शोधण्यासाठी कॅनडा येथे काही नमुने पाठवण्यात आले आहेत. दरम्यान मागच्या काही काळात अशा घटना घडल्या आहेत याचाही याबाबत संबंध असल्याचे विमान अधिकाऱ्यांची माहिती आहे.
हे ही वाचा : मध्यरात्रीपर्यंत सुरू होतं पावसाचं थैमान, गाड्या पाण्यात वाहत होत्या, पुण्याचे 5 धक्कादायक VIDEO
प्रकरणाच्या चौकशीनंतर विमान प्रशासनाकडून सूचना
इंजिन ऑईलचे नमुने 30 दिवसांऐवजी दर 15 दिवसांनी अधूनमधून घेतले घेण्यात यावे. तसेच PW150A या तेलाचे नमुने Pratt आणि Whitney Canada ला पाठवण्यात यावे. तसेच या आठवड्यात काही विमानांची बोरोस्कोपीक तपासणी करण्याच्या आदेश देण्यात आले. प्रत्येक आठवड्याला तपासणी करताना तेलाची कुठे गळती आहे का?
ब्लीड-ऑफ व्हॉल्व्ह स्क्रीन सह सर्वबाबींची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कोणत्याही धातूचे कण आढळल्यास विमान सोडण्यापूर्वी इंजिनची बोरोस्कोपिक तपासणी केली जाणार आहे. याचबरोबर DGCA या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवणार आहे. कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे.