मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मुंबई-गोवा हायवेवर दोन कारची समोरासमोर धडक; शिमग्याच्या पालखीसाठी मुंबईहून कोकणात जाताना झाला घात

मुंबई-गोवा हायवेवर दोन कारची समोरासमोर धडक; शिमग्याच्या पालखीसाठी मुंबईहून कोकणात जाताना झाला घात

Mumbai Goa Highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर कळंबणी गावाजवळ हा अपघात झाला. मारुती ब्रिझा कार आणि टाटा नॅनोचा भीषण अपघात झाला. पाच जण जखमी झाले आहेत.

Mumbai Goa Highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर कळंबणी गावाजवळ हा अपघात झाला. मारुती ब्रिझा कार आणि टाटा नॅनोचा भीषण अपघात झाला. पाच जण जखमी झाले आहेत.

Mumbai Goa Highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर कळंबणी गावाजवळ हा अपघात झाला. मारुती ब्रिझा कार आणि टाटा नॅनोचा भीषण अपघात झाला. पाच जण जखमी झाले आहेत.

मरत्नागिरी, 30 मार्च:  मुंबई गोवा महामार्गावर (Mumabi Goa Highway) कळंबणी गावाजवळ अपडे फाटा येथे मारुती ब्रीझा कार आणि टाटा नॅनोचा भीषण अपघात (Accident) झाला. समोरासमोर धडक बसल्याने दोन्ही गाड्यांमधील एकूण पाच जण जखमी झाले आहेत. नॅनो कारमधील चालकाला गंभीर दुखापत झाली असून त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर मारुती ब्रीझा कारमधील चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी दुपारी 2 च्या सुमारास झाला. ब्रिझा कारमधील प्रवासी मुंबई येथून त्यांच्या गावी वरवेली- गुहागर येथे शिमगोत्सवासाठी पालखीच्या दर्शनाला येत होते. त्यावेळेस हा अपघात झाला या अपघातात दोन्ही गाड्याचं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

राजेंद्र शिंदे हे शिमगोत्सव सुरु असल्याने ग्रामदेवतेच्या पालखीच्या दर्शनासाठी मुंबईहून गुहागरला येत होते. तेव्हा कळंबणी गावानजीक अपडे फाट्याजवळ समोरून येणाऱ्या टाटा नॅनोने त्यांच्या गाडीला धडक दिली. या अपघातात टाटा नॅनो कारमधील चालक राहुल पवार याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला तात्काळ खेड मधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर ब्रिझा कारमधील राजेंद्र दत्ताराम शिंदे, निर्मला शिंदे, सायली शिंदे आणि ज्योती विचारेया चौघांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्या हाताला पायाला जखमा झाल्या आहेत. त्यांना तात्काळ कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.

रेल्वे प्रवासात रात्री मोबाईल, लॅपटॉप चार्ज करता येणार नाही! जाणून घ्या नेमकं का

या अपघाताची नोंद खेड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत. गेल्या आठवड्यात याच ठिकाणी आत्तापर्यंतचार अपघात झाले असून एक जण ठार झाला आहे.

First published:

Tags: Accident