मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Mumbai Engineer Suicide : मुंबईतील 25 वर्षीय तरूण उचलत होता टोकाचं पाऊल; मदतील आली अमेरिकन सुरक्षा यंत्रणा, काय आहे प्रकरण?

Mumbai Engineer Suicide : मुंबईतील 25 वर्षीय तरूण उचलत होता टोकाचं पाऊल; मदतील आली अमेरिकन सुरक्षा यंत्रणा, काय आहे प्रकरण?

मुंबईतील जोगेश्वरी येथे राहणाऱ्या मुलाने गुगलवर आत्महत्या करण्याची सोपी पद्धत कोणती असे सर्च केले होते.

मुंबईतील जोगेश्वरी येथे राहणाऱ्या मुलाने गुगलवर आत्महत्या करण्याची सोपी पद्धत कोणती असे सर्च केले होते.

मुंबईतील जोगेश्वरी येथे राहणाऱ्या मुलाने गुगलवर आत्महत्या करण्याची सोपी पद्धत कोणती असे सर्च केले होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 17 फेब्रुवारी : सध्या आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. आत्महत्या करण्यासाठी काही लोक गुगलवर वेगवेगळ्या कल्पना शोधत असतात. दरम्यान अशीच एक घटना समोर आली आहे. मुंबईतील जोगेश्वरी येथे राहणाऱ्या मुलाने गुगलवर आत्महत्या करण्याची सोपी पद्धत कोणती असे सर्च केले होते. यावरून त्याला आत्महत्येपासून रोखण्यासाठी अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणेने मदत केली. यातून त्याने आत्महत्या न करण्याचा विचार केल्याचे माहिती आहे. त्या युवकाने बरेच शब्द सर्च केल्याची माहिती अमेरिकन सुरक्षा यंत्रणेने दिली आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसारन, मुंबईतील जोगेश्वरी येथे 25 वर्षीय तरूण आत्महत्या करण्याचा विचार करत होता. तो इंजिनियर असल्याने आत्महत्या करण्याची सोपी पद्धत कोणती याबाबत इंटरनेटवर शोधाशोध सुरू केली. दरम्यान त्याला आत्महेत्यापासून परावृत्त करण्यासाठी अमेरिकन संस्थेने मदत केली आहे.

हे ही वाचा : औरंगाबादेत पुन्हा पोलिसाचा राडा, दारूच्या नशेत महिलांना शिवीगाळ; कारवाईच्या मागणीसाठी मध्यरात्री ठिय्या

या सुरक्षा यंत्रणेने प्रसंगावधान दाखवत याबाबतची माहिती नवी दिल्लीतील इंटरपोलला दिली. त्यानंतर येथून मुंबई पोलिसांना संपूर्ण माहिती देऊन या अभियंत्याला आत्महत्या करण्यापासून वाचवले. या तरूणाने याआधीही आत्महत्या करण्याचे प्रयत्न केले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले.

सर्वात पहिला याबाबतची माहिती ‘युनायटेड स्टेट्स नॅशनल सेंट्रल ब्यूरो (यूएसएनसीबी) इंटरपोल वॉशिंग्टन’ या अमेरिकन सुरक्षा यंत्रणेला मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीने यासंदर्भातील माहिती इंटरपोल नवी दिल्ली यांना दिली. या प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी हे प्रकरण मुंबई पोलीस विभागातील गुन्हे शाखेच्या इंटरपोल कक्षास पाठवण्यात आले. त्यानंतर ही माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष 5 ला देण्यात आली. 

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ वरिष्ठांच्या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक अजित गोंधळी व पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषण करून आणि इतर माहितीच्या आधारे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या जोगेश्वरी येथील 25 वर्षीय व्यक्तीला कुर्ला येथून ताब्यात घेतले. 

हा तरुण एका खासगी कंपनीत काम करीत आहे. त्याने त्याच्या शिक्षणाकरिता आणि दैनंदिन गरजांकरिता विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले होते. कमी वेतनात कर्जाचे हफ्ते व घरखर्च भागवू शकत नसल्याने नैराश्यग्रस्त होऊन आत्महत्या करण्याचा विचार करीत होता. तसेच त्याने यापूर्वी 3 ते 4 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. 

हे ही वाचा : नशेच इंजेक्शन देऊन पत्नीला संपवलं, दोन दिवस तिच्यासोबत राहिला अन्…, धक्कादायक खुलासा

त्यानंतर आत्महत्या करण्याकरिता सोप्या पद्धती इंटरनेटवर शोधून आत्महत्या करण्याचे प्रयत्नात असल्याचे सांगितले. या तरुणाला ताब्यात घेऊन त्याचे समुपदेशन करून त्यास आत्महत्येपासून परावृत्त केले असून त्याला त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

First published:
top videos

    Tags: America, India america, Internet, Suicide attempt, Suicide news