औरंगाबाद, 17 फेब्रुवारी, अविनाश कानडजे : औरंगाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील एका पोलीस अधिकाऱ्याने महिलेचा विनयभंग केला होता. हे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा अशीच घटना समोर आली आहे. पुन्हा एकदा एका पोलीस अधिकाऱ्याने मद्यधुंद अवस्थेत महिलांना अश्लील शिवीगाळ करत राडा केला आहे. अनिल बोडले असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. हा पोलीस अधिकारी महिलांना शिवीगाळ करत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. दारूच्या नशेत महिलांसोबत गौरवर्तन करणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करावी यासाठी मध्यरात्रीपर्यंत महिलांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. अखेर या पोलीस अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. मध्यरात्री ठिय्या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबादमध्ये गुरुवारी रात्री मद्यधुंद अवस्थेमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने महिलांना अश्लील शिवीगाळ करत चांगलाच राडा केला. अनिल बोडले असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. या घटनेनं महिला चांगल्याच आक्रमक झाल्या. संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी त्यांनी मध्यरात्रीपर्यंत जवाहरनगर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. अखेर या पोलीस अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. महिलांनी तक्रारीत काय म्हटलं या घटनेनंतर महिला चांगल्याच आक्रमक झाल्या, त्यांनी या प्रकरणात संबंधित पोलीस अधिकाऱ्याविरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तसेच त्याच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यात मध्यरात्री ठिय्या केला. संबंधित पोलीस अधिकाऱ्याने कॉलनीतील महिलांना शिवीगाळ कतर राडा केला. तसेच महिलांच्या अंगावर बॉल फेकून मारला असं आपल्या तक्रारीमध्ये महिलांनी म्हटलं आहे. या पोलीस अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.