अमृतसर, 17 फेब्रुवारी : पंजाबमधील मोगा गावातील पहारसिंग प्रीतनगर येथील राहत्या घरी एका व्यक्तीने आपल्या पत्नीला अंमली पदार्थाचे इंजेक्शन देऊन ठार मारल्याची घटना समोर आली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर तो सुमारे दोन दिवस आपल्या दोन वर्षांच्या मुलासह तो घरातच राहिला होता. घरातून दुर्गंधी पसरल्यानंतर शेजाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून या खुनाचा उलगडा झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 फेब्रुवारीच्या संध्याकाळी घरातून दुर्गंधी आल्याने शेजाऱ्यांना शंका आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असता घराला कुलूप होते. पत्नीचा मृतदेह बेडवर टाकून आरोपी रोहित शर्मा फरार झाला होता. मृतदेह जवळपास कुजला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा : औरंगाबादेत पुन्हा पोलिसाचा राडा, दारूच्या नशेत महिलांना शिवीगाळ; कारवाईच्या मागणीसाठी मध्यरात्री ठिय्या
मोगा शहर दक्षिण पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमनदीप कंबोज यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहितला अटक करण्यात आली आहे. चौकशीत त्याने पत्नीला नशेचे इंजेक्शन देऊन खून केल्याची कबुली दिली. दोघांमध्ये अनेकदा भांडण होत असे आणि अनेकवेळा मोनिका तिच्या माहेरच्या घरी गेली होती पण तो तिला पुन्हा घेऊन यायचा. पतीच्या म्हणण्यानुसार तिला नेमके कधी इंजेक्शन दिले ते आठवत नसल्याचे सांगितलं.
जालंधरच्या शाहकोटचे रहिवासी असलेले मोनिकाचे वडील परमिंदर पाल यांनी पोलिसांना सांगितले की, या ऑक्टोबर 2017 मध्ये या दोघांचे लग्न झाले होते. यांच्यात वारंवार भांडण व्हायचे परंतु पती तिची माफी मागून तो तिला परत घेऊन जायचा.
हे ही वाचा : बापाचं पोटच्या मुलासोबत धक्कादायक कृत आधी गळा चिरला अन् नंतर...; घटनेनं ठाण्यात खळबळ
पोलीस अधिकारी कंबोज म्हणाले की, रोहित स्थानिक भाषेतील वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम करत होता. पत्नीच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर ती आईसोबत राहायची पण आई कामानिमीत्त काही दिवसांपासून शहराबाहेर गेली याचाच फायदा घेत पती रोहितने तिची हत्या केल्याचे बोलले जात आहे. सध्या आरोपी रोहित शर्माला मोगा शहर दक्षिण पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम 302 अंतर्गत हत्येचा एफआयआर नोंदवून अटक करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Drugs, Murder news, Punjab