औरंगाबाद, 08 ऑगस्ट : कोरोनाच्या संसर्ग होवू नये म्हणून दोन व्यक्तींमध्ये आपण अंतर राखतो. पण, कोरोनाच्या धास्ती आणि अपुऱ्या माहितीमुळे कोरोनाबाधितांवर बहिष्कार टाकण्याच्या घटना समोर आल्या आहे. पण, औरंगाबादमध्ये एका 90 वर्षांच्या वृद्ध आजीसोबत रक्ताच्या नात्यातील माणसांनीच असंवेदनशीलपणा केला आहे.
कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एका 90 वर्षांच्या वृद्ध महिलेला जंगलात टाकून नातेवाईक फरार झाल्याची लाजीरवाणी घटना घडलीआहे. ही घटना कच्चीघाटी परिसरात घडली आहे.
भाजप खासदाराचा प्रताप, मध्यरात्री सलून उघडायला लावले आणि केली कटिंग, VIDEO
या वृद्ध महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे या महिलेबद्दल शासकीय रुग्णालयाला सांगणे आणि दाखल करणे अपेक्षित होते. त्यातच 90 वर्षांच्या या महिलेची अवस्था आधीच बिकट होती. वय झाल्यामुळे या वृद्ध महिलेला हालचाल करणेही कठीण झाले होते. अशा वेळी या महिलेची देखभाल करणे गरजेचं होतं. पण, नातेवाईकांनीच या वृद्ध महिलेला जंगलात नेऊन टाकले.
एका गोधडीत या वृद्ध महिलेला जंगलात सोडून देण्यात आले होते. जंगलात सोडल्यानंतर नातेवाईक तिथून फरार झाले. जंगल परिसरात राहणाऱ्या लोकांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी या महिलेबद्दल पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या महिलेला ताब्यात घेतले. त्यानंतर या वृद्ध महिलेला जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. या महिलेवर कोरोना उपचार सुरू आहे. मरणासन्न अवस्थेत जंगलात टाकलेल्या महिलेची प्रकृती मात्र आता स्थिर आहे.
राष्ट्रवादी आमदारांच्या लहान भावाचा भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू
या महिलेला जंगलात टाकून देणाऱ्या नातेवाईकांनी माहिती घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
मरणासन्न असलेल्या या वृद्ध महिलेची या वयात काळजी घेण्याची गरज असताना नातेवाईकांनी तिच्यासोबत केलेल्या वर्तनामुळे परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.