मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'खासदाराला अर्ज भरता येऊ नये', गुलाबराव पाटलांचा रक्षा खडसेंना टोला

'खासदाराला अर्ज भरता येऊ नये', गुलाबराव पाटलांचा रक्षा खडसेंना टोला

'एखाद्या कार्यकर्त्याचा अर्ज बाद होत असेल, त्याला कळत नसेल, त्याने असा आरोप केला तर ठीक आहे पण..'

'एखाद्या कार्यकर्त्याचा अर्ज बाद होत असेल, त्याला कळत नसेल, त्याने असा आरोप केला तर ठीक आहे पण..'

'एखाद्या कार्यकर्त्याचा अर्ज बाद होत असेल, त्याला कळत नसेल, त्याने असा आरोप केला तर ठीक आहे पण..'

    जळगाव, 24 ऑक्टोबर : जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून (Jalgaon District Bank Election) महाविकास आघाडी (mva government) आणि भाजपच्या (bjp) नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. 'खासदाराला अर्ज भरता येऊ नये, याला काय म्हणावं' असं म्हणत पालकमंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी भाजप खासदार रक्षा खडसेंना (rakasha khadse) टोला लगावला. जिल्हा बँक निवडणुकीत भाजपच्या दिग्गज उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याच्या मुद्द्यावरून उठलेल्या वादंगावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना भाजपवर निशाणा साधला. IND vs PAK मॅचदरम्यान अमित शहा पोहोचले भारत-पाक सीमेवरील बंकरमध्ये, पाहा VIDEO 'एखाद्या कार्यकर्त्याचा अर्ज बाद होत असेल, त्याला कळत नसेल, त्याने असा आरोप केला तर ठीक आहे पण खासदाराचाच अर्ज बाद होत असेल तर तो काय गुलाबराव पाटलाने बाद केला का? असा खोचक प्रश्नही मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला. राष्ट्रवादीचा भाजपवर आरोप दरम्यान, जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या खासदार रक्षा खडसे व माजी आमदार स्मिता वाघ यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने भाजपने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी मंत्री सतीश पाटील माजी मंत्री गुलाबराव देवकर व जिल्हा बँकेचे अध्यक्ष रोहिनी खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या आरोपाचे खंडन केले. Hirkani 2nd Anniversary : प्रसाद ओकची ‘हिरकणी’ साठी खास पोस्ट 'रक्षा खडसे व स्मिता वाघ यांनी भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांना जाणीवपूर्वक फसवले, असा आरोप राष्ट्रवादीचे माजी मंत्री सतीश पाटील यांनी केला आहे. भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांना पुढे पक्षातून तिकीट घ्यायचे असेल म्हणून गिरीश महाजन यांच्या आदेशाने रक्षा खडसे यांनी जिल्हा बँकेत उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र रक्षा खडसे यांना जिल्हा बँकेत उभारण्याची हिम्मत नव्हती म्हणून जाणीवपूर्वक उमेदवारी अर्ज अपूर्ण ठेवल्याचा आरोपही सतीश पाटील यांनी केला.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या