मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Hirkani 2nd Anniversary : प्रसाद ओकची ‘हिरकणी’ साठी खास पोस्ट

Hirkani 2nd Anniversary : प्रसाद ओकची ‘हिरकणी’ साठी खास पोस्ट

प्रसाद ओकने हिरकणी (Hirkani) या सिनेमाला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एक खास पोस्ट केली आहे.

प्रसाद ओकने हिरकणी (Hirkani) या सिनेमाला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एक खास पोस्ट केली आहे.

प्रसाद ओकने हिरकणी (Hirkani) या सिनेमाला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एक खास पोस्ट केली आहे.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 24 ऑक्टोबर : मराठमोळा अभिनेता प्रसाद ओक( prasad oak) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव असतो. तो त्याच्या अगामी प्रोजेक्टची माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असतो. प्रसाद ओकने हिरकणी (Hirkani) या सिनेमाला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एक खास पोस्ट केली आहे.

प्रसाद ओकने इन्साटावर हिरकणी सिनेमाचे पोस्टर शेअर करत म्हटले आहे की, #हिरकणी ला आज दोन वर्ष पूर्ण झाली...2019 सालचा #superhit मराठी सिनेमा...सर्वप्रथम रसिक प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार...!!!आणि आता 2 वर्षांनंतर पुन्हा एकदा चित्रपटगृहं सुरू झाली आहेत. राज्य सरकारचेही आभार... आणि लवकरात लवकर 100% उपस्थितीत चित्रपटगृहं सुरू करावीत अशी नम्र विनंती...!!!

आता फक्त माझ्याच नाही तर येणाऱ्यासर्व मराठी चित्रपटांमागे आपल्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे #superhit लागावं हीच मायबाप रसिकांच्या चरणी प्रार्थना..!!ज पुन्हा एकदा माझ्या संपूर्ण टीम चं खूप खूप खूप अभिनंदन...जय भवानी...जय शिवराय...!!!

हिरकणीची गोष्ट दिग्दर्शक प्रसाद ओक पडद्यावर घेऊन आले होते. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलं नाव कमावलं होते. त्यानिमित्तच प्रसाद ओकने ही खास पोस्ट केली आहे. सोनाली कुलकर्णीने ही भूमिका साकारली होती. सोनालिच्या अभिनयचे सर्वांकडून कौतुक झाले. सोनालिने देखील आज यानिमत्त पोस्ट करत सर्वांचे आभार मानले आहेत.

वाचा, रिंकू राजगुरूला गुलाबी साडीत पाहून चाहते सैराट, पाहा Photo

‘हिरकणी’ या भूमिकेला न्याय देण्यासाठी सोनालीने तीन वर्ष अथक परिश्रम केले होते. अगदी तिच्या बोलण्याच्या लहेजापासून ते हुबेहूब हिरकणीप्रमाणे दिसण्यापर्यंत सोनालीने विशेष मेहनत घेतली होती. इतकंच नाही तर तिने तिच्या आहारातही बदल केला होता. सोबतच जीममध्ये रोज घाम गाळल्यानंतरही ती मैदानी व्यायाम प्रकार करत होती, असं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

वाचा: 'पाहिले न मी तुला' मालिकेतील अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन, लिहिली भावनिक पोस्ट

प्रसाद ओक दिग्दर्शित ‘हिरकणी’ सिनेमाची निर्मिती इरादा एंटरटेनमेंटच्या फाल्गुनी पटेल आणि सहनिर्मिती लॉरेन्स डिसुझा यांनी केली होती. राजेश मापुस्कर यांनी सिनेमाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम पाहिले होते. तर कार्यकारी निर्माते म्हणून रत्नकांत जगताप यांनी काम पाहिले होते.

First published: