मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आईनं गाडी घ्यायला दिला नकार; गोदियात तरुणानं सख्ख्या भावाचा दाबला गळा

आईनं गाडी घ्यायला दिला नकार; गोदियात तरुणानं सख्ख्या भावाचा दाबला गळा

Murder in Gondia: गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणाने आपल्या सख्ख्या लहान भावाचा गळा आवळून हत्या केली आहे.

  • Published by:  News18 Desk

गोंदिया, 19 डिसेंबर: गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणाने आपल्या सख्ख्या लहान भावाचा गळा आवळून हत्या (young man killed Mentally retarded bother) केली आहे. आईनं दुचाकी घ्यायला पैसे न दिल्याच्या (mother not give money to purchase bike) कारणातून त्यानं आपल्या भावाला संपवलं आहे. या प्रकरणी आमगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

भुवन डोये असं हत्या झालेल्या 19 वर्षीय भावाचं नाव असून तो मतिमंद आहे. तर हेमंत डोये (23) असं अटक केलेल्या आरोपी भावाचं नाव आहे. आरोपी हेमंत याने गेल्या काही दिवसांपासून आपल्या आईकडे दुचाकी घेण्यासाठी हट्ट धरला होता. पण लहान भाऊ मतिमंद असून त्याच्या उपचारासाठी खूप पैसे खर्च होत असल्याचं सांगून आईनं हेमंतला गाडी घेण्यास पैसे देण्यास नकार दिला.

हेही वाचा-डोंबिवली गँगरेप प्रकरण: 33 पैकी 4 नराधमांना जामीन; पीडितेनं उचचलं मोठं पाऊल

यातून आरोपी मुलाने आपल्या आईसोबत वाद घातला. तसेच 'आज मी तुला मारून टाकणार' अशी धमकी हेमंतने आपल्या आईला दिली. त्यामुळे घाबरलेली आई बाजूच्या घरी झोपायला गेली. यावेळी घरात 19 वर्षीय मतिमंद लहान भाऊ भुवन राहिला. पण हेमंतच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे. याचा जराही अंदाज आईला नव्हता.

हेही वाचा-खळबळजनक! जालन्यात 25 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, तीक्ष्ण हत्याराने घातले घाव

लहान भावाच्या आजारपणामुळे आपल्याला गाडी मिळत नाही. हा राग मनात धरून हेमंतने मध्य रात्री गळा दाबून आपल्या सख्ख्या भावाची हत्या केली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच आमगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा केल्यानंतर, प्राथमिक तपासाच्या आधारावर पोलिसांनी आरोपी भाऊ हेमंतला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Bhandara Gondiya, Crime news, Murder