डोंबिवली, 19 डिसेंबर: काही दिवसांपूर्वी डोंबिवली येथील सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. येथील एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 33 जणांनी सामूहिक अत्याचार केला होता. यामध्ये चार अल्पवयीन आरोपींचा देखील समावेश होता. संबंधित चारही अल्पवयीन गुन्हेगारांची भिवंडी बाल न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. बाल न्यायालयाच्या या निर्णयाला पीडित मुलीनं जिल्हा न्यायालयात आव्हान दिलं आहे. आरोपींचा जामीन रद्द करावा अशी मागणी तिने ठाणे जिल्हा मुख्य न्यायाधीशांकडे केली आहे.
शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात करण्यात आली आहे. यावेळी 'आमचं म्हणणं मांडण्यासाठी थोडी मुदत द्यावी' अशी मागणी आरोपींच्या वकीलाने केली आहे. न्यायालयाने मानपाडा पोलीस आणि संबंधित अल्पवयीन आरोपींचे वकीलांना त्यांचे म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. 7 जानेवारी रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी केली जाणार आहे. या सुनावणीकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा-औरंगाबाद: बडा घर अन् पोकळ वासा; 20 लाखांसाठी डॉक्टर पतीकडून विवाहितेचा अमानुष छळ
नेमकं प्रकरण काय?
डोंबिवली याठिकाणी एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 33 जणांनी अत्याचार केला होता. आरोपींनी नऊ महिन्यांच्या कालावधीत आळीपाळीने पीडितेला नरक यातना दिल्या होत्या. 23 सप्टेंबर रोजी हे प्रकरण उघडकीस येताच राज्यात खळबळ उडाली होती. याप्रकरणी मनपाडा पोलिसांनी दोषारोपपत्र कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात सादर झालं आहे. दरम्यान या गुन्ह्यातील 4 अल्पवयीन आरोपींची भिवंडी बाल न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे.
हेही वाचा-राजधानी हादरली! घरमालकाने भाडेकरूला दिला भयंकर मृत्यू; पत्नीलाही मारहाण
अल्पवयीन आरोपींचे दोषारोपपत्र 3 दिवसात दाखल होणं गरजेचं असतं. असं असूनही मानपाडा पोलिसांनी मात्र या कामासाठी दीड महिना लावला आहे. या कालावधीत दोन अल्पवयीन आरोपींना जामीन मंजूर झाला आहे. तर अन्य दोघांना आरोपपत्रानंतर जामीन मंजूर करण्यात आला. चौघांना जामीन देण्याच्या भिवंडी बाल न्यायालयाच्या निर्णयाला पीडिताच्या वतीने ठाणे येथील जिल्हा न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gang Rape