Home /News /maharashtra /

खळबळजनक! जालन्यात 25 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, तीक्ष्ण हत्याराने घातले घाव

खळबळजनक! जालन्यात 25 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, तीक्ष्ण हत्याराने घातले घाव

Murder in Jalna: शुक्रवारी मध्यरात्री जालना शहरात एका 25 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या (25 years old man brutally murdered) केल्याची घटना घडली आहे.

जालना, 19 डिसेंबर: शुक्रवारी मध्यरात्री जालना शहरात एका 25 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या (25 years old man brutally murdered) केल्याची घटना घडली आहे. आज सकाळी जालना शहरातील बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयाजवळ ही घटना उघडकीस आली आहे. हत्येची ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) केला असून घटनेच्या तपासाला सुरुवात केली आहे. तौफिक उर्फ राहील खान असं हत्या झालेल्या 25 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो शहरातील लालबाग परिसरातील रहिवासी आहे. त्याची हत्या नेमकी कोणी आणि कोणत्या कारणातून केली? याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. आज सकाळी काही स्थानिक नागरिकांना मृतदेह दिसल्यानंतर, ही घटना उघडकीस आली आहे. यावेळी आसपासच्या परिसरातील अनेक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. हेही वाचा-कुंड्या चोरल्याने दिली तालिबानी शिक्षा; महिला पोलिसानं मायलेकाची काढली धिंड या घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांनी देखील तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता, घटनास्थळी एक फुटलेल्या अवस्थेतील मोबाइल सापडला आहे. पोलिसांनी मोबाइल ताब्यात घेतला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. संबंधित मृत तरुणाच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे व्रण ( attack with sharpen weapon) आढळले आहे. डोक्यात वार केल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. हेही वाचा-राजधानी हादरली! घरमालकाने भाडेकरूला दिला भयंकर मृत्यू; पत्नीलाही मारहाण पण शवविच्छेदनाचा अहवाल येणं बाकी आहे. याप्रकरणी चंदनझिरा पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून हत्येच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Crime news, Maharashtra, Murder

पुढील बातम्या