सांगली, 03 ऑगस्ट: आई आणि बाळाचं नातं हे जगातील सर्वात मजबूत नातं मानलं जातं. बाळावर कोणतंही संकट आलं तर आई आपल्या जीवाची पर्वा न करता त्या संकटाला सामोरं जाते. हे चित्र केवळ मानव जातीतच पाहायला मिळतं असंही नाही. तर प्राण्यांमध्ये देखील हा गुण आढळतो. पण सांगलीतील एका महिलेनं मात्र आई आणि बाळाच्या नात्याला (Mother child relation) काळिमा फासला आहे. तिने आपल्या 2 वर्षाच्या चिमुकीची निर्घृण हत्या (Mother murdered daughter) केली आहे. या प्रकरणी सांगलीतील संजयनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपी आईला अटक (Mother Arrest) केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
रेवती संजय लोकरे असं 26 वर्षीय संशयित आरोपी आईचं नाव आहे. ज्ञानदा संजय लोकरे असं हत्या झालेल्या 2 वर्षीय बालिकेचं नाव आहे. रविवारी दुपारी आईचं राक्षसी रुप सांगलीकरांना पाहायला मिळालं आहे. जन्मदात्या आईनंच आपल्या पोटच्या 2 वर्षांच्या चिमुकलीची गळा घोटून हत्या केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. संजयनगर पोलीस आरोपी आईची कसून चौकशी करत आहेत.
हेही वाचा-पुणे हादरलं! पैसे परत घ्यायला गेला अन् परतलाच नाही; स्मशानभूमीतच तरुणाचा शेवट
नेमकं काय घडलं?
2 वर्षीय मृत ज्ञानदा गतीमंद होती. जन्मतःच ती मानसिकदृष्ट्या विकलांग असल्यानं संशयित आई रेवतीला तिच्यावर राग होता. यामुळे तिने रविवारी दुपारी घरी कोणी नसल्याची संधी साधत आपल्या चिमुकल्या लेकीचा जीव घेतला आहे. आरोपी आईनं चिमुकलीचा एका हातानं गळा आणि दुसऱ्या हातानं तोंड दाबून निर्दयीपणे हत्या केली आहे. रविवारी दुपारी चिमुकली मृत आढळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.
हेही वाचा-वृद्ध आई-वडिलांना घराबाहेर काढणाऱ्या मुलाला कानपूर पोलिसांचा दणका; शिकवला धडा
या घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच पोलिसांनी संशयित आरोपी आई रेवती लोकरे हिला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. आरोपी आई रेवती सांगली शहरातील दगडे प्लॉट परिसरात आपली आई, सासू,नणंद, दीर आणि ज्ञानदा यांच्यासोबत वास्तव्याला होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder, Sangli