• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • वृद्ध आई-वडिलांना घराबाहेर काढणाऱ्या मुलाला कानपूर पोलिसांचा दणका; असा शिकवला धडा

वृद्ध आई-वडिलांना घराबाहेर काढणाऱ्या मुलाला कानपूर पोलिसांचा दणका; असा शिकवला धडा

वृद्ध आई-वडिलांना मारहाण करणारा आणि त्यांना घराबाहेर हाकलून देणारा मुलगा आणि त्याची पत्नी या दोघांना पोलिसांनी अटक केली

 • Share this:
  कानपूर, 02 ऑगस्ट : ज्यांनी आपल्याला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, त्या आई-वडिलांना त्यांच्या वृद्धावस्थेत आधार देणं हे मुला-मुलींचं कर्तव्य असतं. काही जणांना मात्र या कर्तव्याचा विसर पडतो. काही जण तर आई-वडिलांची काळजी घेणं सोडाच, पण त्यांना त्रास देण्यातच धन्यता मानतात. अशा मुलांना चांगला धडा शिकता येईल, अशी एक कारवाई उत्तर प्रदेशातल्या (Uttar Pradesh) कानपूरच्या पोलिस आयुक्तांनी नुकतीच केली. वृद्ध आई-वडिलांना मारहाण करणारा आणि त्यांना घराबाहेर हाकलून देणारा मुलगा आणि त्याची पत्नी या दोघांना पोलिसांनी अटक केली आणि पीडित आई-वडिलांना आपला हक्काचा निवारा मिळवून दिला. कानपूरमधल्या (Kanpur) चकेरी (Chakeri) इथल्या जाजमऊमधल्या केडीए कॉलनीत ही घटना घडली. अनिलकुमार शर्मा आणि कृष्णा शर्मा या वृद्ध दाम्पत्याला त्यांचा मुलगा गेली अनेक वर्षं मारपीट करायचा. एकदा त्याने त्यांना थेट घराबाहेरच काढलं. त्या दोघांना घराबाहेर काढल्यावर त्या मुलाने त्यांचं सामान एकत्र करून त्या खोलीला आपल्याकडचं कुलूप लावलं होतं. पीडित शर्मा दाम्पत्याने चकेरी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि मुलगा व सुनेच्या विरोधात तक्रारही दाखल केली; मात्र त्यावर कोणतीच कार्यवाही न झाल्याने ते व्यथित झाले. हे वाचा - सासरच्या जाचाला कंटाळून जावयानं संपवलं जीवन;पत्नीसह सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल म्हणून या दाम्पत्याने कानपूरचे पोलिस आयुक्त असीम अरुण (Kanpur Police Commissioner Aseem Arun) यांची भेट घेतली. डोळ्यांत अश्रूंचा महापूर घेऊन आलेल्या या दाम्पत्याची कहाणी ऐकल्यावर सर्वांच्याच डोळ्यांत पाणी तरळलं. पोलिस आयुक्तांचं काळीजही हललं. त्यानंतर ते स्वतः त्या दाम्पत्याला घेऊन त्यांचा मुलगा आणि सुनेच्या घरी गेले. सुरुवातीला त्यांनी त्या दोघांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यातून फारसं काही निष्पन्न होत नसल्याचं पाहून आयुक्तांनी त्या दोघांना थेट अटक केली आणि त्यांच्यावर शांतिभंगाची कारवाई केली. त्या दोघांना तीन दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) पाठवण्यात आलं. त्या वृद्ध दाम्पत्याच्या संरक्षणासाठी दोन पोलिसांचीही नेमणूक करण्यात आली. या घटनेनंतर कानपूर पोलिसांची सर्वत्र प्रशंसा होत आहे. या घटनेची सर्वत्र चर्चा आहे. अशा प्रकारचा त्रास गेली अनेक वर्षं सोसत असलेल्या अनेक वृद्ध दाम्पत्यांसाठी आशेचा एक किरण यातून निर्माण झाला आहे. कोणत्याही पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात असं प्रकरण आल्यास ते गांभीर्याने घ्यावं आणि वृद्ध दाम्पत्यांना/वृद्ध व्यक्तींना तातडीने दिलासा देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत.
  First published: