मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

जावयानं सासूला ट्रॅक्टरनं चिरडलं, परस्पर पुरला मृतदेह; 13 दिवसांनंतर धक्कादायक प्रकार उघड

जावयानं सासूला ट्रॅक्टरनं चिरडलं, परस्पर पुरला मृतदेह; 13 दिवसांनंतर धक्कादायक प्रकार उघड

बीड, 6 जून: बीड जिल्ह्यात एकाच दिवशी खुनाच्या दोन घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील खापरटोन येथे एका व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तर नेकनूर येथील मांडवखेल येथे पती-पत्नीच्या भांडणात सासूने मध्यस्थी केल्याच्या रागातून जावयानं सासूची हत्या केली आहे. हेही वाचा.. कारचा भीषण अपघात, भाजप नगरसेवकाच्या पुत्रासह दोघांचा जागेवरच मृत्यू तर एक गंभीर जावयानं सासूच्या अंगावर ट्रॅक्टर घालून तिचा निर्घृण खून केला आहे. एवढंच नाही तर मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली. हा धक्कादायक प्रकार 13 दिवसानंतर उघडकीस आला आहे. पहिली खुनाची घटना अंबाजोगाई तालुक्यातील खापरटोन येथे घडली आहे. सोपान मुसळे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. सोपान यांचा डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे. बरदापूर पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. असून खुनाचं कारण अद्याप समजू शकले नाही. जावयानं सासूच्या अंगावर घातला ट्रॅक्टर... दुसरी घटना नेकनूर येथील मांडवखेल येथे घडली आहे. एकाने त्याच्या सासूच्या अंगावर टॅक्टर घालून तिची हत्या केली आहे. पती पत्नीच्या भांडणात सासूने मध्यस्थी केल्याच्या रागातून जावयाने सासूला ट्रॅक्टरनं चिरडलं. एवढंच नाही तर तिचा मृतदेह परस्पर पुरला. मात्र, तब्बल 13 दिवसांनंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. आरोपी सचिन कदमसह त्याच्या वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुलीकडे आलेली महिला बेपत्ता असल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी दाखल केली होती. तपास करताना संशयित म्हणून महिलेचा जावई सचिन तुकाराम कदम व त्याचे वडील तुकाराम कदम यांना नेकनूर पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी खुन केल्याची कबुली दिली. हेही वाचा...काय सांगता! तरुणानं अख्खी रात्र काढली वाघाच्या पिंजऱ्यात, नंतर झालं असं... अलका हनुमंत जोगदंड (वय- 40, रा. अंकुश नगर, बीड) असं मृत महिलेचं नाव आहे. महिलेला ट्रॅक्टरखाली चिरडून खून केला नंतर तिचा मृतदेह पुरला. मात्र, 13 दिवसानंतर खुनाचा उलगडा झाला आहे. बीड जिल्ह्यात खुनाची मालिका सुरूच असून महिन्याभरातील ही पाचवी घटना आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Beed, Crime, Marathwada

पुढील बातम्या