मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आई सोडून गेली पण 10 महिन्याचे बाळ दूध पिण्यासाठी धडपडत होतं, अमरावतीतील डोळ्यात पाणी आणणारी घटना

आई सोडून गेली पण 10 महिन्याचे बाळ दूध पिण्यासाठी धडपडत होतं, अमरावतीतील डोळ्यात पाणी आणणारी घटना

तिचा मृतदेह शेजारी तिचे दोन्ही मुलं भुकेनं झालेली व्याकुळता पाहून पाहणाऱ्यांचे मन खिन्न झाले. 10 महिन्याची केतकी भूक लागल्याने आईचे दूध पिण्याचे प्रयत्न करत होती.

तिचा मृतदेह शेजारी तिचे दोन्ही मुलं भुकेनं झालेली व्याकुळता पाहून पाहणाऱ्यांचे मन खिन्न झाले. 10 महिन्याची केतकी भूक लागल्याने आईचे दूध पिण्याचे प्रयत्न करत होती.

तिचा मृतदेह शेजारी तिचे दोन्ही मुलं भुकेनं झालेली व्याकुळता पाहून पाहणाऱ्यांचे मन खिन्न झाले. 10 महिन्याची केतकी भूक लागल्याने आईचे दूध पिण्याचे प्रयत्न करत होती.

अमरावती, 26 नोव्हेंबर : अमरावतीतील (amravati) शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या (Shivaji Agricultural College) आवारात एका महिलेचा मृतदेह (deadbody) आढळून आला.  धक्कादायक म्हणजे, या महिलेच्या मृतदेहाच्या बाजूलाच 10 महिन्याचे मुलगी भुकेने व्याकूळ असल्याने आईचं दूध पिण्याचा प्रयत्न करत असल्याचे हृदयद्रावक चित्र पाहण्यास मिळेल. हे दृश्या पाहून उपस्थितीचे डोळे पाणावले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी सात वाजेच्या दरम्यान शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य कॉलेज परिसरात येताच त्यांना आपल्या कॉलेजच्या आवारात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेच्या शेजारीच 10 महिन्यांची बालिका तर कॉलेज परिसरातील एका इमारतीवर चार वर्षाचा मुलगा खेळताना आढळला. घटनेची माहिती त्यांनी तातडीने गाडगेनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसारामजी चोरमले यांना दिली.

पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतला. यावेळी लहान मुलाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्या ४ वर्षीय बालकाने आपले नाव रुद्र, आईचे नाव तनुश्री व बहिणीचे नाव केतकी एवढेच सांगू शकत होता, गावाचे नाव आणि त्याला सांगता येत नव्हते त्यामुळे पोलिसांपुढे मुख्य पेच निर्माण झाला. मात्र गाडगेनगर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले  यांनी तपासाची चक्रे जलदगतीने फिरवत आसपासच्या जिल्ह्यातील ठाणेदारांना फोन करून कुणी महिला बेपत्ता आहे का याची माहिती घेतली.

संप अखेर मिटला? कर्मचाऱ्यांनी कामावर जाण्याचे ST कृती समितीचं आवाहन

अखेर ही महिला नागपूर जिल्ह्यातील रुई खैरी या गावातील असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चोरमले यांनी शोधून काढली. सदर महिलेची ओळख पटली असून रुई खैरी येथील तनुश्री सागर करलुके असल्याचे निष्पन्न झाले. तनुश्रीचा घरी कौटुंबिक वाद झाल्याने ती 4 वर्षीय रुद्र व 10 महिन्यांची केतकी या दोन मुलांसह 25 नोव्हेंबर रोजी  घराबाहेर पडली. आज सकाळी तनुश्रीचा मृतदेह कृषी महाविद्यालयाच्या परिसरात आढळून आला.

मात्र तिचा मृतदेह शेजारी तिचे दोन्ही मुलं भुकेनं झालेली व्याकुळता पाहून पाहणाऱ्यांचे मन खिन्न झाले. 10 महिन्याची केतकी भूक लागल्याने आईचे दूध पिण्याचे प्रयत्न करत होती तर चार वर्षीय रुद्र मृतदेहाच्या आसपास फिरत होता. या दोघांनाही आपली आई या जगातून सोडून गेली याची कल्पना देखील नव्हती.

Personal Loan की Auto Loan? कोणतं कर्ज आहे तुमच्यासाठी चांगलं? जाणून घ्या फरक

तनुश्रीचे पती सागर करलूके यांनी या घटनेची तक्रार कालच बुट्टी बोरी पोलीस स्टेशनला दिली होती. मात्र तनुश्री ची आत्महत्या आहे की हत्या हे मात्र अजूनही निष्पन्न झालेले नाही. तनुश्रीच्या मृतदेहाचा पंचनामा झाला असून शवविच्छेदन झाल्यानंतरच तिचा मृत्यू आत्महत्या की हत्या कशाने झाला याचा उलगडा होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

First published:

Tags: Amravati, Crime, Murder