कल्याण, 26 जुलै: अंगात भूत असल्याच्या संशयावरून लाकडी दांडक्यानं बेदम मारहाण करून मायलेकाला जीवे ठार मारल्याची घटना कल्याण शहरातील खडकपाडा परिसरात घडली आहे. अटाळी येथे अंधश्रद्धेतून मायलेकाचा बळी घेतल्यानं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अघोरी बाबासह चार आरोपींना ताब्यात घेतलं आहे. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
हेही वाचा...कार दुचाकीची जोरदार धडक, भीषण अपघाताचा थरारक LIVE VIDEO
पंढरीनाथ शिवराम तरे (50) आणि चंदूबाई शिवराम तरे (76) अशी मृतांची नावं आहेत. या मायलेकाच्या अंगात भूत येत असल्याच्या संशयावरून दोघांना नातेवाईक अटाळी येथील अघोरी बाबाकडे नेत असत. अघोरी बाबाच्या सांगण्यावरून नातेवाईकांनीच मायलेकांना भूत उतरवण्याच्या नावाखाली लाकडी दांडक्यानं बेदम मारहाण केली. त्यात दोघांचा मृत्यू झाला. खडकपाडा पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
आरोपींमध्ये मृत पंढरीनाथ तरे यांचा अल्पवयीन मुलगा, पुतण्या, पुतणी आणि अघोरी बाबाचा समावेश आहे. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अटाळी येथील गणेश नगरमधील भोईर कंपाऊंड परिससरातील सद्गुरू माऊली कृपा सदन येथे हा धक्कादायक प्रकार घडला. अघोरी बाबा सुरेंद्र पाटील यांच्या सांगण्यावरून दिपेश पंढरीनाथ तरे, विनायक कैलास तरे, कविता कैलास तरे आणि त्यांच्या अल्पवयीन मुलानं लाकडी दांडक्यानं पंढरीनाथ तरे आणि चंदूबाई तरे या मायलेकांना बेदम मारहाण करून ठार मारलं.
हेही वाचा...पुणे हादरलं, बंद घरात आढळले सडलेल्या अवस्थेत वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह
मायलेकाच्या अंगात भूत आहे, असा दावा अघोरी बाबा सुरेश पाटील याने केला होता. अंगातील भूत काढण्यासाठी दोन्ही मायलेकांची पूजा करावी लागेल असंही त्यानं सांगितलं होतं. शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता अघोरी बाबाच्या सांगण्यावरून नातेवाईकांनीच मायलेकाला बेदम मारहाण केली. त्यात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.