Home /News /news /

कार दुचाकीची जोरदार धडक, भीषण अपघाताचा थरारक LIVE VIDEO

कार दुचाकीची जोरदार धडक, भीषण अपघाताचा थरारक LIVE VIDEO

एका छोट्या चुकीनं होत्याचं नव्हतं झालं, भरधाव कारनं दुचाकीला उडवलं

    गोंडल, 26 जुलै: देशात काही शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आलं आहे तर काही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानं पुन्हा एकदा हळूहळू अनलॉक करण्यात येत आहे. अनेकदा महामार्गावर नजर हटी दुर्घटना घटी असे फलक लिहिलेले आपण पाहातो मात्र खरंच एका चुकीमुळे भीषण अपघात घडल्याचा LIVE व्हिडीओ समोर आला आहे. भरधाव कार आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता दुचाकी चालक लेन सोडून दुसऱ्या लेनमध्ये आल्यानं हा भीषण अपघात झाला आहे. वेगात असलेला कार चालकाची या दुचाकीला जोरदार धडक बसली आणि त्यामुळे दुर्घटना घडली. हा संपूर्ण प्रकार कारमध्ये असलेल्या मोबाईलफोनमध्ये कैद झाला आहे. अंगावर शहारे आपणारा अपघाताचा live व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये कार आणि दुचाकीचं मोठं नुकसान झालं आहे. हे वाचा-याला म्हणता क्वालिटी! टाटाच्या नॅनोला भिडली होंडा सिटी, पण तोंडच चेपले, VIDEO हा भीषण अपघात गुजरात महामार्गावरील गोंडल इथे घडला आहे. यामध्ये दुचाकीवर असलेले दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की कार चालकानं दुचाकीची लेन सोडून दुसऱ्या लेनवर गाडी घेत असताना मागू येणाऱ्या भरधाव कारनं जोरदार धडक दिली. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या