मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: मुंबई विरुद्धच्या मॅचपूर्वी राजस्थनाला दिलासा, संजूला मिळाला नवा आधार

IPL 2021: मुंबई विरुद्धच्या मॅचपूर्वी राजस्थनाला दिलासा, संजूला मिळाला नवा आधार

मुंबई इंडियन्सच्या मॅचपूर्वीच राजस्थान रॉयल्सला दिलासा मिळाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा बॅट्समन रेसी वेन डर डुसेनची (Rassie van der Dussen) टीममध्ये निवड करण्यात आली आहे.

मुंबई इंडियन्सच्या मॅचपूर्वीच राजस्थान रॉयल्सला दिलासा मिळाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा बॅट्समन रेसी वेन डर डुसेनची (Rassie van der Dussen) टीममध्ये निवड करण्यात आली आहे.

मुंबई इंडियन्सच्या मॅचपूर्वीच राजस्थान रॉयल्सला दिलासा मिळाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा बॅट्समन रेसी वेन डर डुसेनची (Rassie van der Dussen) टीममध्ये निवड करण्यात आली आहे.

नवी दिल्ली, 29 एप्रिल: मुंबई इंडियन्सच्या मॅचपूर्वीच राजस्थान रॉयल्सला दिलासा मिळाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा बॅट्समन रेसी वेन डर डुसेनची (Rassie van der Dussen) टीममध्ये निवड करण्यात आली आहे. त्याची बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) जागी टीममध्ये निवड करण्यात आली आहे. स्टोक्स पंजाब किंग्ज विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये जखमी झाला होता. ख्रिस गेलचा कॅच घेताना स्टोक्सच्या बोटाला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर असल्यानं स्टोक्सला आयपीएल स्पर्धा सोडून इंग्लंडमध्ये उपचारासाठी परत जावं लागलं. डुसेन सध्या टीमच्या हॉटेलमध्ये 7 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत आहे.

पहिल्यांदाच आयपीएल खेळणार

डुसेन पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धेत खेळणार आहे. यापूर्वी तो पाकिस्तान सुपर लीग, कॅरिबियम प्रीमियर लीग, ग्लोबल टी20 कॅनडा यासारख्या टी20 स्पर्धेत खेळला आहे. डुसेन सध्या चांगल्या फॉर्मात आहे ही राजस्थानसाठी दिलासादायक बाब आहे. पाकिस्तान विरुद्ध झालेल्या टी20 मालिकेत डुसेननं 153 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटनं रन 86रन काढले होते. तर वन-डे मालिकेतील 2 मॅचमध्ये 183 रन काढले होते. यामध्ये नाबाद 123 रनच्या खेळीचा समावेश आहे.

कुणी खेळाडू देता का?

राजस्थानचे ऑलराऊंडर बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर (Jofra Archer) दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर झाले आहेत. संजू सॅमसन (Sanju Samson) नेतृत्व करत असलेल्या या टीममध्ये आता जॉस बटलर (Jos Buttler), ख्रिस मॉरिस (Chris Morris), डेव्हिड मिलर (David Miller) आणि मुस्तफिझूर रहमान (Mustafizur Rahaman) हे चार परदेशी खेळाडूच उरले आहेत.

खेळाडूंनंतर अंपायर्सचं IPL 2021ला अलविदा, Nitin Menon यांच्या आई-पत्नीला कोरोना

राजस्थान टीमशी जोडल्या गेलेल्या एका सूत्राने पीटीआयशी संवाद साधला, तेव्हा आम्ही इतर टीमकडून उधारीवर खेळाडू घ्यायचा प्रयत्न करत असल्याची माहिती दिली. यासाठी राजस्थान टीमने वेगवेगळ्या फ्रॅन्चायजींना पत्रही लिहिलं आहे, पण यावर अजून कोणताही निर्णय झालेला नाही.

First published:

Tags: Coronavirus, IPL 2021, Rajasthan Royals