नवी दिल्ली, 13 जून : कोरोना विषाणूचा (कोविड -19) महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीमध्ये सर्वात जास्त कहर झाला आहे. आतापर्यंत 6346 लोकांचा साथीच्या आजारामुळे मृत्यू झाला आहे. जो देशातील एकूण मृत्यूंपैकी 71.43 टक्के आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 11458 नवीन रुग्ण आढळले आहेत, त्यानंतर संक्रमित लोकांची संख्या 3 लाखांवर गेली आहे. या महामारीमुळे देशात एकूण 8884 लोक मरण पावले आहेत. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील वेगवेगळी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. या साथीच्या आजाराचा सर्वात जास्त परिणाम महाराष्ट्रात झाला आहे. गेल्या 24 तासांत राज्यात आतापर्यंत 3493 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 127 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात याचा परिणाम झालेल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाखाच्या पार गेली आहे. प्राणघातक विषाणूमुळे मृतांचा आकडा 3717 पर्यंत वाढली आहे. हेही वाचा- चांगली बातमी! महाराष्ट्रात आता कोरोना चाचणीचे दर सर्वात कमी कोरोना विषाणूमुळे तामिळनाडू दुसऱ्या क्रमांकावर आहे. संसर्ग झालेल्यांची संख्या आतापर्यंत 40698 आणि 367 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीची स्थिती सातत्याने ढासळत आहे. संक्रमित लोकांच्या संख्येत दिल्ली देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. राजधानीत कोरोना संसर्गाने सर्वात दुराग्रही असल्याचे दिसून आले. संक्रमित लोकांची संख्या 36 हजारांवर असून तर मृतांची संख्याही 1200 पार झाली आहे. दिल्लीत आतापर्यंत 36824 लोकांना संसर्ग झाला असून आतापर्यंत 1214 जणांचा मृत्यू झाला आहे. कोविड-19 प्रभावाच्या बाबतीत देशाचे पश्चिम राज्य गुजरात चौथ्या क्रमांकावर आहे. परंतु, मृत्यूच्या संख्येत हे राज्य महाराष्ट्रानंतर दुसर्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत गुजरातमध्ये 22527 लोकांना संसर्ग झाला असून 1415 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. लोकसंख्येनुसार, देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात आतापर्यंत 12616 कोरोना विषाणूची लागण झाली असून 365 रुग्ण मरण पावले आहेत. राजस्थानमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. संक्रमित लोकांची संख्या 12068 वर पोहोचली असून272 लोकांचा मृत्यू झाला आहे. **हेही वाचा-** श्वेता तिवारीच्या Ex Husband ने शेअर केले पर्सनल चॅट, अभिनेत्रीला संताप अनावर मध्य प्रदेशात आतापर्यंत 10,443 लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे आणि 440 रुग्ण मरण पावले आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत 10244 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आतापर्यंत 451 जणांचा मृत्यू झाला आहे. संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.