चांगली बातमी! महाराष्ट्रात आता कोरोना चाचणीचे दर सर्वात कमी

चांगली बातमी! महाराष्ट्रात आता कोरोना चाचणीचे दर सर्वात कमी

आतापर्यंत घेण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीचे दर कमी करण्यात आले आहे. हे दर देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी आहेत

  • Share this:

मुंबई, 13 जून : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात जनतेसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे   सरकारने राज्यात कोरोना टेस्टचे दर कमी केले आहेत. आता आपल्याला खाजगी लॅबमधील चाचणीसाठी फक्त 2200 रुपये द्यावे लागतील. यापूर्वी या चाचणीची किंमत 4500 रुपये होती.

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, तपासणीच्या कमी किंमतींमुळे लोकांना दिलासा मिळेल. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना चाचणीचे दर सर्वात कमी असल्याचा दावा आरोग्यमंत्र्यांनी केला आहे.

हे आहेत नवीन दर 

व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडिया (व्हीटीएम) च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या स्वॅब चाचणीसाठी रुग्णालयांकडून 2200 रुपये व घरातून नमुने घेतल्यानंतर रूग्णांसाठी 2800 रुपये घेतले जातील. पूर्वी तोंडाच्या लाळचे नमुने गोळा करण्यासाठी 4500 आणि  5200 रुपये घेतले जात होते.

दर होऊ शकतात आणखी कमी

टोपे म्हणाले की, राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार खाजगी लॅब इतकीच  रक्कम आकारू शकतात. ते म्हणाले, "जर खाजगी प्रयोगशाळेने यापेक्षा अधिक शुल्क आकारले तर त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल." हे नवीन दर देशात सर्वात कमी असल्याचा त्यांचा दावा आहे. ते म्हणाले की, राज्यात कोविड - 19 चाचणी घेण्यासाठी 91 लॅब आहेत.

महाराष्ट्रात कोरोना

महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी राज्यातील कोरोनाची 1 लाखांच्या पुढे गेली आहे. महाराष्ट्रात या संसर्गामुळे 3717 लोकांचा बळी गेला आहे.

हे वाचा-ट्रकच्या धडकेत कारचा चक्काचूर, काळजाचा थरकाप उडवणारा अपघात

खाणीत माती खचल्यामुळे 5 जणांचा जागीच मृत्यू, ढिगाऱ्याखाली अडकले डझनभर कामगार

 

संपादन - मीनल गांगुर्डे

First published: June 13, 2020, 4:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading