Home /News /maharashtra /

कोरोनाच्या उपचारासंदर्भात मोठी बातमी, महाराष्ट्रात प्लाझ्मा थेरपीला केंद्राची मंजुरी

कोरोनाच्या उपचारासंदर्भात मोठी बातमी, महाराष्ट्रात प्लाझ्मा थेरपीला केंद्राची मंजुरी

जीवघेण्या कोरोना उपचारासंदर्भात मोठी बातमी आहे. ती म्हणजे महाराष्ट्रात प्लाझ्मा थेरपीला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे.

    मुंबई, 24 एप्रिल: जीवघेण्या कोरोना उपचारासंदर्भात मोठी बातमी आहे. ती म्हणजे महाराष्ट्रात प्लाझ्मा थेरपीला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. कोरोना उपचारासाठी महाराष्ट्रात पुल टेस्टींग आणि प्लाझ्मा थेरपी उपचाराला केंद्रीय आरोग्यमंत्र्याकडून शुक्रवारी मान्यता मिळाली, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. याबाबत अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, कोरोना प्रतिबंधाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दुपारी देशातले सर्व आरोग्यमंत्री व सचिवांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.  राज्य शासनाकडून मागणी करण्यात आलेल्या पूल टेस्टींग व प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीला मान्यता देण्यात आली. हेही वाचा.. कोरोनाच्या लढ्यात या मुख्यमंत्र्यांची रुग्णसेवा;वाढदिवशी बजावलं डॉक्टरचं कर्तव्य याबैठकीत महाराष्ट्राकडून मांडण्यात आलेल्या पोर्टेबल पल्स ऑक्सिमीटर व एक्स-रे चाचणीच्या मदतीने कोरोना रुग्णाचे लवकर निदान करणे शक्य होईल आणि त्यातून मृत्यूदर कमी करता येऊ शकेल, असा मुद्दा मांडण्यात आला. त्याचबरोबर पीपीई कीटचे निर्जंतुकीकरण करून त्याचे पुर्नवापर करण्यासाठी मुद्दे सुचविण्यात आले. त्याचे विशेष कौतुक यावेळी करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिले. राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोना चाचणी सुरू करण्याच्या मागणीला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे, कोरोना विषाणूच्या उपचारात दिल्लीत मोठं यश आलं आहे. दिल्लीत प्लाझ्मा थेरपीची चाचणी घेण्यात आली. प्रारंभिक चाचणीचा निकाल सकारात्मक आला आहे. याच धर्तीवर आता केंद्राने महाराष्ट्रात प्लाझ्मा थेरपी घेण्यास मंजुरी दिली आहे. आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. या पार्श्वभूमीवर कंटेनमेंट झोनमध्ये जलद गतीने चाचणी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे प्लाझ्मा थेरपीची परवानगी मागितली होती. आता मुंबई व कोल्हापूरमध्ये प्लाझ्मा थेरपीचा सर्वप्रथम वापर करण्यात येणार आहे. हेही वाचा.. कोरोनाला हरवण्याचा प्रयत्न फसला, चीनने वापरलेलं औषध क्लिनिकल ​चाचणीत फेल कोल्हापुरात कोरोनाबाधित रुग्णावर प्लाझ्मा थेरपी करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने एक प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. आता त्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. आधी कोल्हापूर आणि नंतर पुणे, मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर आता कोल्हापुरात एका गंभीर कोरोनाबाधित रुग्णावर प्लाझ्मा थेरेपी करण्यात येणार आहे. 18 एप्रिलरोजी पुण्यात पूर्णपणे बरा झालेल्या रुग्णाच्या प्लाझ्माची यात मदत घेण्यात येणार आहे. हा रुग्ण बरा झाल्यानंतर त्याच्या परवानगीने त्याचा 550 मिलीलीटर प्लाझ्मा घेण्यात आला होता. आता हा प्लाझ्मा कोल्हापुरातील कोरोनाबाधित रुग्णाला बरे करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. हेही वाचा...आनंद महिंद्रांनी रिक्षाचालकाचं केलं कौतुक, कोरोनाच्या संकटात थक्क करणारी कल्पना दरम्यान, देशात कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 23 हजार 077 इतकी झाली आहे. तर 4 हजार 749 रुग्ण बरे झाले आहेत. तर 718 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 1हजार 684 नवीन प्रकरणे तर 24 तासांत 37 मृत्यू झाला आहे. संपादन- संदीप पारोळेकर
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या