कोरोनाच्या लढ्यात या मुख्यमंत्र्यांनी केली थेट रुग्णसेवा; वाढदिवशी डॉक्टर म्हणून बजावलं कर्तव्य
47व्या वाढदिवशी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा कोरोनामुक्त झाल्यानंतर कोरोनाशी लढणाऱ्या फ्रंटलाइन फायटर्सचे आज आभार मानले. गोव्यातील म्हापसाच्या जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांनी आपली सेवा प्रदान केली.


गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा आज 47वा वाढदिवस आहे. आणि एकदम अनोख्या पद्धतीने त्यांनी हा वाढदिवस साजरा केला.


पेशाने डॉक्टर असणाऱ्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज म्हापुसा याठिकाणी रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.


गोवा कोरोनामुक्त झाल्यानंतर कोरोनाशी लढणाऱ्या फ्रंटलाइन फायटर्सचे त्यांनी आज आभार मानले. गोव्यातील म्हापसाच्या जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांनी आपली सेवा प्रदान केली.


गोव्यामध्ये 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होते. आता सर्व रुग्ण बरे झाल्याने डॉ. प्रमोद सावंत यांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे.


डॉ. प्रमोद सावंत यांनी आज त्यांच्या वाढदिवशी म्हापसामधील जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या टीमबरोबर ओपीडीमध्ये सेवा देत एक आदर्श ठेवला आहे.


लोकांची सेवा करणं ही माझी आवड आहे आणि त्यामुळे मला खूप समाधान मिळते अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.