जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बांदेकरांसोबतची मैत्री कर्तव्याच्या आड येवू देऊ नका, सिद्धीविनायक मंदीर प्रकरणी मनसेचा फडणवीसांना इशारा

बांदेकरांसोबतची मैत्री कर्तव्याच्या आड येवू देऊ नका, सिद्धीविनायक मंदीर प्रकरणी मनसेचा फडणवीसांना इशारा

बांदेकरांसोबतची मैत्री कर्तव्याच्या आड येवू देऊ नका, सिद्धीविनायक मंदीर प्रकरणी मनसेचा फडणवीसांना इशारा

मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी सिद्धीविनायक मंदीरात घोटाळा झाल्याचा आरोप आदेश बांदेकर यांच्यावर केला होता.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 05 जानेवारी : मागच्या काही दिवसांपासून मनसेकडून ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांच्यावर आरोप होत आहेत. मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी सिद्धीविनायक मंदीरात घोटाळा झाल्याचा आरोप आदेश बांदेकर यांच्यावर केला होता. यावरून पुन्हा यशवंत किल्लेदार यांनी रान उठवण्यास सुरुवात केली आहे. मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी आदेश बांदेकर यांची तक्रर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले. दरम्यान बांदेकर आणि फडणवीस हे मित्र असल्याने बांदेकर यांच्यावर कारवाई होणार की नाही यावरून आता तर्कवितर्क सुरू आहेत. यावरून  मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

जाहिरात

सिद्धिविनायक विश्वस्त मंडळ चौकशी बाबात आपली मैत्री न्याय कर्तव्याच्या आड येणार नाही याची काळजी घ्या अशा शब्दात किल्लेदार यांनी निशाणा साधला आहे. बांदेकर तुमची प्रतिमा मलिन करत आहेत अशा आशयाचे ट्विट करत किल्लेदार यांनी फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत.

हे ही वाचा :  मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंची शिवसेना तयार! ‘स्पेशल 12’ वर मोठी जबाबदारी

किल्लेदार म्हणाले की, जनतेचा आपल्यावर विश्वास आहे त्याला तडा जाणार नाही याची काळजी घ्या. देवेंद्रजी काही tweet वाचनात आले त्याप्रमाणे आदेशभाऊजी आपल्या मैत्रीचे दाखले देऊन क्लीन चीट मिळणार असे सांगत सुटले आहेत. हे काही योग्य नाही. आपली प्रतिमा डागळत आहे. जनतेचा आपल्यावर विश्वास आहे त्याला तडा जाणार नाही. याची काळजी घ्या.

जाहिरात

आपली मैत्री न्याय कर्तव्याच्या आड येणार नाही याची आम्हाला खात्री आहे पण जनतेलाही त्याची प्रचिती येऊ दे. आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. अशा आशयाचे ट्वीट करण्यात आले आहे.

किल्लेदार यांचा आदेश बांदेकर यांच्यावर निशाणा

मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी आदेश बांदेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सिद्धीविनायक ट्रस्टच्या नावाखाली बांदेकर यांनी पैसे खाल्याचे किल्लेदार यांचे म्हणणे आहे, यावेळी किल्लेदार म्हणाले की, उद्धव ठाकरेंचे सरकार असताना ही शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली. दरम्यान यावेळी या शिवभोजन थाळीचे काम सिद्धिविनायक न्यास मंदीराला आले होते.

जाहिरात

हे ही वाचा :  मी आता शपथ घेतली की, बायकोला सोडून कुणाचाही स्पर्श..; आव्हाडांच्या मनात चाललंय काय?

मंदीर प्रशासन ही थाळी देऊ शकले असते पण बांदेकरांनी याला फक्त अर्थसहाय्य देतो असे पत्र दिले. बांदेकरांनी फक्त उद्धव ठाकरे यांच्या गुडबुकमध्ये जाण्यासाठी आणि कॅबिनेट दर्जा मिळण्यासाठी हा प्रकार केल्याचा आरोप किल्लेदार यांनी केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात