जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मी आता शपथ घेतली की, बायकोला सोडून कुणाचाही स्पर्श..; आव्हाडांच्या मनात चाललंय काय?

मी आता शपथ घेतली की, बायकोला सोडून कुणाचाही स्पर्श..; आव्हाडांच्या मनात चाललंय काय?

मी आता शपथ घेतली की, बायकोला सोडून कुणाचाही स्पर्श..; आव्हाडांच्या मनात चाललंय काय?

ठाण्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. नवी मुंबईतील नेरूळमधील एका कार्यक्रमात बोलत होते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

प्रमोद पाटील (मुंबई), 05 जानेवारी : मागच्या चार दिवसांपूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजेंवर वक्तव्य केल्याने नवा वाद समोर आला होता. दरम्यान यावरून भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. भाजप नेत्यांना सडेतोड प्रत्त्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चांगलीच कंबर कसली आहे. ठाण्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. नवी मुंबईतील नेरूळमधील एका कार्यक्रमात बोलताना आव्हाड यांनी भाजप आणि शिंदेंवर टीका केली.

जाहिरात

यावेळी आव्हाड म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणजेच व्हाईस रॉय ऑफ महाराष्ट्र अशीच स्थिती झाली आहे. कधी काय बोलतील आणि करतील सांगता येत नाही. आजकाल कोणालाही अंगावर घेण्याची भीती वाटते कधी रात्री उचलून घेऊन जातील याचा काय अंदाज राहिला नाही. गुन्हा कोणता असेल तोही सांगता येणार नाही, माझ्या आयुष्यात पहिले 72 तासात दोन गुन्हे दाखल झाले. यामुळे मी आता कोणतीही गोष्ट करताना विचार करून करत आहे. असा उपरोधीक टोला आव्हाड यांनी लगावला.

हे ही वाचा :  मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंची शिवसेना तयार! ‘स्पेशल 12’ वर मोठी जबाबदारी

ते पुढे म्हणाले की, आजकाल बाई दिसली तर मी चार फूट लांब पळतो. मी आता शपथ घेतली की बायकोला सोडून कुणाचाही स्पर्श करायचा नाही. सरकार म्हणजे कहर आहे ज्या पद्धतीने सरकार वागत ती पद्धत कौतुकास्पद आहे, हम करो से कायदा या सरकारचे धोरण आहे. ठीक आहे थोडे दिवस हुकूमशाही ही लोक सहन करतील, हे लोक काय घडवून आणतील याचाही अंदाज सांगता येत नाही.

जाहिरात

लोकशाहीवर आता विश्वासच राहिला नाहीये याचे उत्तम उदाहरण आता ठाण्यामध्ये तर टिपून टिपून मारताहेत, मुख्यमंत्र्यांना असे वाटते की अख्ख ठाणे माझ्या हातात असावं. एवढं वर्ष राजकारण शरद पवारांनी केलं त्यांचं बारामती झालं नाही. असेही आव्हाड म्हणाले.

ज्या महिलेने साथ दिली नाही तिचं हॉटेल तोडून टाकलं, एकाच घर तोडून टाकलं, म्हणजे हे मुख्यमंत्री नाहीत तर व्हाईस रॉय ऑफ महाराष्ट्र आहेत असा टोला आव्हाड यांनी लगावला. कोटीवधी रुपयांच्या घोषणा केल्या जात आहेत मात्र पैसा आहे कुठे ?  

जाहिरात

हे ही वाचा :  अमित शाहांनी मुंबईत ते पोस्टर पाहिलं, अन् सत्तांतर घडलं! शिवसेनेतल्या भुकंपाची Inside Story

तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोगेंद्र कवाडे यांच्यासोबत युती केली. याचा राज्याच्या राजकारणात कोणताही फरक पडणार नाही किंवा शिंदेची मोठी ताकद वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. असे काहीही घडणार नाही. तसेच संभाजीराजेंविषयी बोलल्यावर भाजप टीका करते, भाजप काय म्हणते त्यावर जिंतेंद्र आव्हाड चालत नाही असाही टोला त्यांनी लगावला.

जाहिरात

25 वर्ष या विषयावर बोलत आहे,त्यामुळे नवीन आलेल्यांच्या नादाला मी लागत नाही असेही आव्हाड म्हणाले. आम्ही आमच्या विचारावर ठाम आहोत, ही जी मनुवादी विचार सरणी आहे, त्याने इतिहासच वाटोळे केले असल्याचे आव्हाड म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात