मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

रामदास कदमांकडून जीवाला धोका असल्याचा दावा, वैभव खेडेकर आणि संजय कदम यांना पोलीस संरक्षण

रामदास कदमांकडून जीवाला धोका असल्याचा दावा, वैभव खेडेकर आणि संजय कदम यांना पोलीस संरक्षण

दोन दिवसांपूर्वी रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना चांगलेच टार्गेट केले होते. यावेळी त्यांनी वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) आणि संजय कदम (Sanjay Kadam) यांच्यावरही निशाणा साधला होता.

पुढे वाचा ...

रत्नागिरी, 20 डिसेंबर : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातल्या दापोली-खेड विधानसभा मतदारसंघातील राजकारण (Konkan Politics) अक्षरशः पराकोटीला पोहचलेलं बघायला मिळत आहे. खेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar), राष्ट्रवादीचे दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम (Sanjay Kadam) यांनी शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यापासून आपल्याला धोका असल्याचा दावा केला होता. त्यामुळे त्यांनी प्रशासनाकडे पोलीस संरक्षण (Police protection) मागितलं होतं. त्यांच्या या मागणीला प्रशासनाने हिरवा कंदील देखील दिला आहे. वैभव खेडेकर आणि संजय कदम यांना पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे.

रामदास कदमांची स्फोटक पत्रकार परिषद

दोन दिवसांपूर्वी रामदास कदम यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन परिवहन मंत्री अनिल परब यांना चांगलेच टार्गेट केले होते. यावेळी त्यांनी वैभव खेडेकर आणि संजय कदम यांच्यावरही निशाणा साधला होता. "मंत्री अनिल परब हे रत्नागिरी जिल्ह्यात वैभव खेडेकर आणि संजय कदम यांना हाताशी धरुन शिवसेना संपवत आहेत. तसेच दापोली विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार असलेल्या माझ्या मुलाच्या राजकीय भवितव्याला धोका पोहचवत आहेत", असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं होतं.

हेही वाचा : शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करणार? रामदास कदम म्हणाले, "मी भगव्याशी प्रामाणिक, जर पक्षातून काढलं तर...."

वैभव खेडेकर आणि संजय कदम यांनी आरोप फेटाळले

दरम्यान, रामदास कदम यांनी केलेले आरोप वैभव खेडेकर आणि संजय कदम यांनी फेटाळले होते. रामदास कदम हे पुत्र प्रेमामुळे आंधळे झाले आहेत. त्यांच्यामुळे आमच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आम्हाला पोलीस संरक्षण द्यावे, अशी त्यांनी मागणी केली होती. त्यांच्या मागणीनंतर कालपासून दोघांनाही पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे.

हेही वाचा : रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांना मोठा धक्का

नेमकं प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वी रामदास कदम यांच्या आवाजातला कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाला होता. त्या ऑडिओतला आवाज हा रामदास कदम, भाजप नेते किरीट सोमय्या आणि एका आरटीआय कार्यकर्त्याचा असल्याचा दावा करण्यात आला होता. किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. परबांनी दापोलीच्या मुरुड समुद्रकिनाऱ्यावर बेकायदेशीर रिसॉर्ट बांधल्याचा दावा केला होता. त्यांच्या या आरोपांसाठी रामदास कदम यांनी पुरावे दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. विशेष म्हणजे रामदास कदम यांनी संबंधित ऑडिओ क्लिपमधील आवाज आपला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या साऱ्या घटनाक्रमामुळे कोकणातील राजकीय वातावरण तापलं आहे.

First published: