मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करणार? रामदास कदम म्हणाले, "मी भगव्याशी प्रामाणिक, जर पक्षातून काढलं तर...."

शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करणार? रामदास कदम म्हणाले, "मी भगव्याशी प्रामाणिक, जर पक्षातून काढलं तर...."

Ramdas Kadam: शिवसेनेचे नेते रामदास कदम हे शिवसेना सोडून इतर पक्षात प्रवेश करणार का? या प्रश्नावर रामदास कदम यांनी उत्तर दिलं आहे.

Ramdas Kadam: शिवसेनेचे नेते रामदास कदम हे शिवसेना सोडून इतर पक्षात प्रवेश करणार का? या प्रश्नावर रामदास कदम यांनी उत्तर दिलं आहे.

Ramdas Kadam: शिवसेनेचे नेते रामदास कदम हे शिवसेना सोडून इतर पक्षात प्रवेश करणार का? या प्रश्नावर रामदास कदम यांनी उत्तर दिलं आहे.

मुंबई, 18 डिसेंबर : वादग्रस्त कथित ऑडिओ क्लिप व्हायरल (Audio clip viral) झाल्यानंतर शिवसेनेत एकच खळबळ उडाली. या क्लिपवरुन रामदास कदम (Shiv Sena leader Ramdas Kadam) यांच्यावर शिवसेनेतून टीकाही झाली. त्यानंतर रामदास कदम हे दसरा मेळाव्यातही गैरहजर राहिले आणि मग विधान परिषदेवरही शिवसेनेने संधी दिली नाही. त्यामुळे आता रामदास कदम शिवसेना सोडणार का? असा प्रश्न विचारला जात होता. आज रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलं आहे. (Will Ramdas Kadam join BJP? read what he said)

शिवसेना सोडणार का?

आम्ही शिवसेना विरोधात कधी ही काम करणार नाही. मी शिवसेनेतून कधीच बाहेर पडणार नाही. माझी मुलं निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत. मला पक्षातून काढलं तरी मी शिवसैनिक म्हणून जगेन. मी भगव्याशी प्रामाणिक आहे. मी दोन वर्षात मातोश्रीवर गेलो नाही उद्धवजींना एकदाच विधान भवनात भेटलो. मी भाजपमध्ये जातोय अशा बातम्या छापून आणल्यात रत्नागिरी ला आणि त्या उद्धवजींना दाखवल्या जातात. मी उद्धवजींशी बोलून निर्णय घेईन.

वाचा : रामदास कदम म्हणाले, "बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो की...."

अनिल परब शिवसेनेच्या मुळावर उठलेत

रामदास कदम पुढे म्हणाले, अनिल परब यांनी माझ्या मुलगा योगेश कदम याच्या विरोधात उमेदवार घेऊन मातोश्रीवर आले होते. शिवसेनेच्या मुळावर अनिल परब उठले आहेत. उदय सामंत काल आले आणि अनिल परब सोबत काल माझ्या मुलाच्या विरोधात प्रचार करतायेत. माझ्या मुलाला संपवण्यासाठी गेली तीन दिवस दापोलीत अनिल परब प्रचार करत आहेत. अनिल परब यांची भाषा अशी की हा राष्ट्रवादीचा नेता आहे. खेडमधील मनसे पदाधिकाऱ्यांचे अनिल परब हे महात्मा गांधी आहेत.

वाचा : रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांना मोठा धक्का

अनिल परबांवर गंभीर आरोप

अनिल परब यांचे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही दूर्लक्ष करत आहेत. केवळ 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला अनिल परब जिल्ह्यात आले आहेत. मला राजकिय दृष्ट्या संपवण्यासाठी शिवसेनेतूनच काहीजण प्रयत्न करत आहेत. अनिल परब कधीच रत्नागिरीत फिरकले नाहीत, त्यांना जिल्हयातील पदाधिकारी माहिती नाहीत असंही रामदास कदम म्हणाले.

अनिल परब म्हणातात मी आमदाराला पैसा देणार नाही. अनिल परब यांच्या बापाचा पैसा आहे का? शिवसेनेचा उमेदवार पाडून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्याचा घाट घातला जातोय. मी कधीच गद्दारी केली नाही. अनिल परब म्हणजे शिवसेना प्रमुख नाही. अनिल परब यांच्या डोक्यात हवा गेलीय असंही रामदास कदम म्हणाले.

First published:

Tags: BJP, Ramdas kadam, Shiv sena