मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /आदित्य ठाकरेंच्या युवासेनेची मनसेनं वाढवली डोकेदुखी, ED करणार चौकशी

आदित्य ठाकरेंच्या युवासेनेची मनसेनं वाढवली डोकेदुखी, ED करणार चौकशी

मुंबई महापालिकेच्या कोविड काळातील भ्रष्टाचाराबाबत काही दिवसांपूर्वी संदीप देशपांडे यांनी पुरावे देत तक्रार केली होती.

मुंबई महापालिकेच्या कोविड काळातील भ्रष्टाचाराबाबत काही दिवसांपूर्वी संदीप देशपांडे यांनी पुरावे देत तक्रार केली होती.

मुंबई महापालिकेच्या कोविड काळातील भ्रष्टाचाराबाबत काही दिवसांपूर्वी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी पुरावे देत तक्रार केली होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 31 जानेवारी : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेनं शिवसेना नेत्यांविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. कोविड काळात भ्रष्टाचाराच्या प्रकरणात युवा सेनेचा पदाधिकारी वैभव थोरात आणि मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ईडी आणि ईओड्ब्लूकडे तक्रार केली होती. या प्रकरणाची आता चौकशी होणार आहे.

मुंबई महापालिकेच्या कोविड काळातील भ्रष्टाचाराबाबत काही दिवसांपूर्वी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी पुरावे देत तक्रार केली होती. मुंबई महापालिका प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी या आधीच चौकशी लावली आहे. त्यानंतर आता ईडी आणि इओड्ब्ल्यू सुद्धा चौकशी करणार आहे.

(शिंदे सरकारला घरचा अहेर, मंत्री दर्जाचा नेता बसणार उपोषणाला!)

ह्या घटनेचे वेगवेगळे ॲंगल्स आहेत, त्यामुळे विविध एजन्सीजला तक्रार दिली आहे. २५-३० कोटी पर्यंत हा भ्रष्टाचार झाला आहे, याची व्याप्ती ७०-७५ कोटींपर्यंत देखील जाऊ शकते. आम्ही ईओडब्ल्यूकडे देखील तक्रार केली आहे. मनी लाँड्रिंगचा देखील ॲंगल आहे. त्यामुळे ईडीकडे देखील तक्रार केली आहे. पालिकेकडे देखील तक्रार केली आहे.

विविध पुरावे दिले असले ती ते कन्फर्म करणं एजन्सीचं काम आहे, त्यामुळे विविध ठिकाणी तक्रार केली आहे. आम्ही वारंवार सांगत होतो, विरप्पन गॅंगनं मुंबईला लुटण्याचं काम केलं आहे. कोरोना काळात विरप्पननं जेवढं लुटलं नसेल तेवढं या गॅंगनं मुंबईला लुटलेले आहे, याचे पुरावे देखील सादर केले आहे, असंही देशपांडेंनी सांगितलं.

('वंचित महविकास आघाडीचा..' प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टचं सांगितलं, पवारांवर पुन्हा निशाणा)

'वैभव थोरात या व्यक्तीनेच केलेलं नाही आहे, याच्या मागची शक्ती कोण आहे हे देखील समोर आलं पाहिजे, त्याला कोणी सांगितलं ही कामं द्यावी म्हणून भ्रष्टाचार कोणी केला हे चेहरे समोर आलेलेच आहेत, याच्या मागचे चेहरे कोण हे पुढे येणं आवश्यक आहे, असंही देशपांडे म्हणाले.

'आमचे पदाधिकारी अखिल चित्रे यांनी यासंदर्भात याआधी देखील म्हाडाकडे तक्रार दाखल केली होती. सरकार त्यांचे होतं त्यामुळे कारवाई झालेली नव्हती जर अनधिकृत बांधकाम केलं असेल. आमदारांकडून जर अनाधिकृत बांधकाम करत असेल तर जनतेनं बघायचं कोणाकडे? आमदारकी रद्द व्हावी यासाठी तक्रार करणार आहे, असा इशाराही देशपांडेंनी अनिल परब यांना दिला.

'संजय राऊतांच्या धमकीने काळं कुत्र देखील घाबरत नाही त्यामुळे त्यांच्या धमक्यांमुळे कोणी आमदार गेलं असेल असं मला वाटत नाही, असा टोलाही देशपांडेंनी राऊतांना लगावला.

First published: