जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मनसेच्या बालेकिल्ल्याला खिंडार; नाशिकमधील शेकडो कार्यकर्ते ठाकरे गटात प्रवेश करणार

मनसेच्या बालेकिल्ल्याला खिंडार; नाशिकमधील शेकडो कार्यकर्ते ठाकरे गटात प्रवेश करणार

मनसेच्या बालेकिल्ल्याला खिंडार; नाशिकमधील शेकडो कार्यकर्ते ठाकरे गटात प्रवेश करणार

नाशिक शहर हा मनसेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र त्याच बालेकिल्ल्याला आता ठाकरे गटाकडून खिंडार पाडण्यात आलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 16 जानेवारी :  नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. नाशिक शहर हा मनसेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र त्याच बालेकिल्ल्याला आता ठाकरे गटाकडून खिंडार पाडण्यात आलं आहे. आज नाशिकमधील मनसेचे शेकडो कार्यकर्ते हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. हे कार्यकर्ते आज मातोश्रीवर ठाकरे गटात सामील होणार आहेत. आमचे जेवढे कार्यकर्ते गेले त्यापेक्षा आता अधिक कार्यकर्ते आमच्या पक्षात येत असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिंदे गटात   काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला होता. ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यापूर्वी देखील एकदा ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. एकीकडे शिंदे गटाकडून ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के देणं सुरू आहे. मात्र दुसरीकडे आता ठाकरे गटाकडून मनसेला मोठा धक्का देण्यात आला आहे. मनसेचे शेकडो कार्यकर्ते आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. मातोश्रीवर हा जाहीर प्रवेश होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश   पुढील काही दिवसांत राज्याच्या प्रमुख शहरातील महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये मुंबई, पुण्यासह नाशिकचा देखील समावेश आहे. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर शेकडो कार्यकर्ते हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्यानं याचा मोठा फटका हा मनसेला बसण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात