मुंबई, 17 फेब्रुवारी : आमदारपदाच्या राजकारणी असेल तर त्याच्या पुढे मागे गाड्यांचा ताफा, दिमतीसा पाच पंचवीस कार्यकर्ते असा थाट माट असतोच. पण एक आमदार याला नेहमी अपवाद ठरतात. या आमदारांच्या कार्यकर्त्यांचीच जास्त चैन असते. पारनेरचे आमदार निलेश लंके यांचा एक फोटो काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झाला होता. मुंबईच्या आमदार निवासात ते चक्क जमिनीवर पथारी पसरून झोपलेले दिसले होते. आता पुन्हा एकदा याच आमदार साहेबांच्या कार्यकर्त्यांनी तसाच फोटो सोशल मीडियावर टाकला आणि या आमदारांचा साधेपणा पुन्हा एकदा चर्चेत आला.
बुधवारी एक कॅबिनेट बैठक असल्याने त्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेर इथले आमदार निलेश लंके मुंबईत भल्या पहाटे पोहोचले. ते आमदार निवासात पोहोचले तेव्हा त्यांची खोली भरलेली होती. राज्यभरातून आलेले कार्यकर्ते झोपले होते. मग निलेश लंके यांनी जागा मिळेल तिथे जमिनीवरच पथारी पसरली आणि आडवे झाले. सकाळी इतर कार्यकर्त्यांना हा साधेपणा दिसला. त्यातल्याच एकाने मोबाईलवर फोटो टिपला. सकाळने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
गेल्या वर्षीसुद्धा असाच किस्सा घडला होता. तेव्हाही आमदार लंके यांचा असा फोटो व्हायरल झाला होता.
हे पाहा - मानले साहेब! कार्यकर्ते झोपले बेडवर, तर आमदारांनी जमिनीवर अंथरली सतरंजी
मुंबईतलं आमदार निवास हे मतदारसंघातून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी हक्काची जागा असते. कुणी शिक्षणासाठी, कुणी आजारी नातेवाईकाला घेऊन तर कुणी रोजगारासाठी मुंबईत येत असतात. या मायानगरीत राहणं हे सामान्यांच्या आवाक्यातलं नाही. त्यामुळे गावाकडून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी आपल्या आमदांराची खोली हे हक्काचं घर असतं. प्रत्येक आमदारांना मुंबईत राहण्यासाठी आमदार निवासात एक फ्लॅट दिला जातो. त्यात किमान दोन खोल्या आणि लहानसं स्वयंपाकघर असतं.
हे वाचा - देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला दिली जाणार फाशी; एकमेव कारागृहात तयारी
कार्यकर्त्यांनी त्या खोल्या कायम हाऊल फुल्ल असतात. पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या फ्लॅटमधला असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यात आमदारांच्या बेडवरही कार्यकर्ते झोपल्याचं दिसत असून रात्री थकून घरात आलेल्या आमदारांनी आपल्या कार्यकर्त्यांना न उठवता खाली सतरंजी टाकली आणि तिथेच ताणून दिली.