मथुरा, 17 फेब्रुवारी: स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला फाशी देण्याचा प्रसंग येणार आहे. उत्तर प्रदेशातल्या अमरोहा इथे राहणाऱ्या शबनम नावाच्या (Who is Shabnam) गुन्हेगार महिलेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तिची फाशी सुप्रीम कोर्टातही कायम ठेवण्यात आली आहे. एवढंच नाही तर राष्ट्रपतींनीही तिचा दयेचा अर्ज फेटाळत फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं आहे.
शबनमने (Shabnam Hanging) आपल्या प्रियकराबरोबर कट रचून आपल्याच घरातल्या 7 जणांची निर्घृण हत्या केली होती. अमरोहा इथे राहणाऱ्या शबनमने एप्रिल 2008 मध्ये आपल्याच नातेवाईकांचा कुऱ्हाडीने मारून जीव घेतला आणि हा भयंकर गुन्हा लगेचच उघडकीला आला. त्यानंतर तिच्यावर खटला दाखल होऊन फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
शबनमच्या फाशीची तारीख अद्याप ठरलेली नाही. पण मथुरेच्या कारागृहात तयारी सुरू झाली आहे. निर्भया केसमधल्या गुन्हेगारांना फासावर चढवणाऱ्या पवन जल्लादने या ठिकाणी दोन वेळा भेट देऊन तपासणी केली आहे.
Sandeep Nahar Suicide Case: संदीप नाहरच्या पत्नी आणि सासू विरोधात गुन्हा दाखल
महिलांसाठी एकमेव फाशीघर
फाशीची अंमलबजावणी करण्यासाठी देशात फक्त मथुरेच्या कारागृहातच महिलांना फाशी देण्याची सोय आहे. या कारागृहात 150 वर्षांपासून महिलांसाठी फाशीची शिक्षा द्यायची सोय करण्यात आली आहे. पण आतापर्यंत इथे एकाही महिलेला फाशी देण्यात आलेली नाही.
स्वतंत्र भारतात महिलेला फासावर चढवण्याचा हा पहिलाच प्रसंग असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.