जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अखेर आमदार बच्चू कडू यांना मंत्रिपदाचा दर्जा, मुख्यमंत्री शिंदेंचे मानले आभार

अखेर आमदार बच्चू कडू यांना मंत्रिपदाचा दर्जा, मुख्यमंत्री शिंदेंचे मानले आभार

आमदार बच्चू कडू यांना मंत्रीपदाचा दर्जा जाहीर

आमदार बच्चू कडू यांना मंत्रीपदाचा दर्जा जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार बच्चू कडू यांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा जाहीर करण्यात आला. याबाबतचे परिपत्रक शासनाकडून काढण्यात आले आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

अमरावती, 24 मे : आमदार बच्चू कडू यांनी अखेर मंत्री पदाचा दर्जा जाहीर झाला आहे. दिव्यांग कल्याण खात्याचे अभियान दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्यासाठी बच्चू कडू यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आलाय. बच्चू कडू यांची दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी या अभियानाचे अध्यक्ष म्हणून निवड झालीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार बच्चू कडू यांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा जाहीर करण्यात आला. याबाबतचे परिपत्रक शासनाकडून काढण्यात आले आहे. दिव्यांगांसाठी बच्चू कडू हे गेल्या २० वर्षांपासून लढा देत आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेत दिव्यांग कल्याण विभागाच्या अभियानासाठी बच्चू कडू यांची निवड केली गेली. या निवडीबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे बच्चू कडूंनी आभार मानले. Live Updates : राज्याच्या मंत्रिमंडळाला उशीर का? कारण आलं समोर मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने जनतेची कामे खोळंबली असल्याचं बच्चू कडू म्हणाले होते. मंत्रिमंडळ विस्तार हा मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला व्हायला हवा. एकाच मंत्र्यांकडे अनेक खाती आहेत. मोठी अडचण निर्माण होत आहे. कामाला गती मिळत नाही. जनतेची कामे वेगाने करायची असतील तर विस्तार महत्त्वाचा आहे. जनतेच्या हिशोबाने विस्तार होणं गरजेचं आहे. येत्या निवडणुकीत त्याचा परिणाम होऊ शकतो. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास त्यात तुम्ही कोणतं खातं मागितलं आहे असं विचारलं असता दिव्यांग मंत्रालय मागितलं असून ते मिळेल असं वाटतंय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिला असल्याचंही बच्चू कडू याआधी प्रतिक्रिया देताना म्हणाले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात