• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • राष्ट्रवादीला झटका, आमदार बाबाजानी दुर्रानींकडून राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

राष्ट्रवादीला झटका, आमदार बाबाजानी दुर्रानींकडून राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

Big jolt for NCP in Parbhani: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक मोठा झटका बसला आहे. कारण, परभणीतील जिल्हाध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

  • Share this:
परभणी, 24 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्रानी (NCP MLA Babajani Durrani) यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. बाबाजानी दुर्रानी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान पक्षाअंतर्गत राजकारण आणि गटबाजीला कंटाळून राजीनामा दिला असल्याचं बोललं जात आहे. (Babajani Durrani resign from ncp parbhani district president post) बाबाजानी दुर्रानी यांची काही दिवसांपासून पक्षातील स्थानिक नेत्यांबाबत नाराजीही होती. पक्षात असलेला अंतर्गत वाद आणि गटबाजी यालाच कंटाळून बाबाजानी दुर्रानी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. येत्या काळात स्थानिक निवडणुका होणार आहेत आणि त्यापूर्वीच बाबाजानी दुर्रानी यांनी राजानामा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा एक झटका असल्याचं बोललं जात आहे. बाबाजानी दुर्रानी हे विधानपरिषदेचे आमदार आणि परभणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. मात्र, त्यांनी आता आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सोपवला आहे. बाबाजानी दुर्रानी यांच्या राजीनाम्यामुळे येत्या निवडुकांत राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी झाली होती मारहाण आमदार बाबाजानी दुर्राणी यांना एका व्यक्तीनं मारहाण केल्याची घटना नुकतीच समोर आली होती. मारेकरी एवढ्यावरच थांबला नाही तर, त्याने आमदाराला जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी आमदार बाबाजानी दुर्राणी हे शहरातील एका अंत्यविधीच्या कार्यक्रमास गेले होते. येथे शोकाकुल वातावरणात बाकड्यावरून बसून सोबतच्या सहकाऱ्यांशी बोलत होते. यावेळी पाथरी शहरातील अजिज मोहल्ला भागातील रहिवासी असणारा मोहम्मदबीन सईदबीन किलेब हा आमदार दुर्राणी यांच्यासमोर आला. त्यावेळी त्याने अश्लील भाषेत शिवीगाळ करत दुर्राणी यांच्या कानशिलात लगावल्या. वाचा : साताऱ्यात लवकरच भूकंप? शरद पवारांसोबत चर्चा केल्यानंतर शशिकांत शिंदेंचं मोठं विधान आमदार शशिंकात शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे  (MLA Shashikant Shinde) यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला आहे. तर ज्ञानदेव रांजणे (Dnyandeo Ranjane) विजयी झाले आहेत. पहिलाच निकाल हा धक्कादायक असल्याचं समोर आलं आहे. या निवडणुकीत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि आमदार शशिकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक निकाल जावली प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघ आमदार शशिकांत शिंदे एका मतांनी पराभूत एकूण मते - 49 झालेली मते - 49 वैध मते - 49 उमेदवार आणि मिळालेली मते शशिकांत शिंदे - 24 मते ज्ञानदेव रांजणे - 25 मते विजयी उमेदवार - ज्ञानदेव रांजणे
First published: