सातारा, 23 नोव्हेंबर : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या निकालानंतर (Satara district central co operative bank election) राष्ट्रवादीचे कार्यालय फोडण्याची घटना घडली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे लगेच साताऱ्यात दाखल झाले आणि शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यासोबत चर्चा केली. 'येत्या 25 तारखेला सविस्तर बोलून माझी राजकीय कारकिर्दीची वाटचाल सुरू करणार आहे. मी आता मोकळाच आहे' असं म्हणत शिंदे यांनी नवे संकेत दिले आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पराभवानंतर खासदार शरद पवार यांनी आमदार शशिकांत शिंदे यांची यांच्याशी सर्किट हाऊस येथे कमराबंद चर्चा झाली. या चर्चेनंतर शशिकांत शिंदे यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
'जिल्हा बँकेच्या प्रक्रियेवर येत्या 25 तारखेला सविस्तर बोलून माझी राजकीय कारकिर्दीची वाटचाल सुरू करणार आहे' अशी माहिती शिंदे यांनी दिली.
तुम्ही राष्ट्रवादीत राहून काम करणार आहात का? असा सवाल पत्रकारांनी विचारला असता 'मी राष्ट्रवादीचा सच्चा पाईक असून मरेपर्यंत शरद पवारांना सोडणार नाही. जिल्ह्यात राष्ट्रवादी वाढविण्याची जबाबदारी आता मी घेतली आहे. मी आता मोकळाच आहे' अशी सूचक प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली.
तुम्हालाही जेवण बनवण्याची प्रचंड आवड असेल Chef म्हणून घडवा करिअर; वाचा सविस्तर
दरम्यान, शशिकांत शिंदे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना 'मी विश्वासामध्ये राहिलो आणि माझा विश्वास घात केला. उमेदवारीसाठी चर्चेची गुऱ्हाळे चालू राहिली आणि ती तशीच राहिली त्यामुळे मी गाफील राहिलो मला वाटलं सगळं मिटलं म्हणून मी निर्धास्त राहिलो. जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मी अडसर समजणाऱ्या लोकांनीच माझा पराभव केला मात्र पराभवाला खचून न जाता जावळीमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उभा करणार असल्याचा इशारा त्यांनी शिवेंद्रराजे यांना दिला आहे.
नेमकं काय घडलं?
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे (Shashiknat Shinde) यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक (Stone pelting on NCP office) झाली आहे. शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.