• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • परभणी: 'आता माझ्याकडे बंदूक असती तर...' धमकी देत NCP आमदाराच्या कानशिलात लगावल्या

परभणी: 'आता माझ्याकडे बंदूक असती तर...' धमकी देत NCP आमदाराच्या कानशिलात लगावल्या

Crime in Parbhani: परभणी जिल्ह्यातील पाथरी (Pathari) शहरात एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार बाबाजानी दुर्राणी यांना एका व्यक्तीनं मारहाण (NCP MLA Babajani Durrani Beating) केली आहे.

 • Share this:
  परभणी, 19 नोव्हेंबर: परभणी (Parbhani) जिल्ह्यातील पाथरी (Pathari) शहरात एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार बाबाजानी दुर्राणी यांना एका व्यक्तीनं मारहाण (NCP MLA Babajani Durrani Beating) केली आहे.  मारेकरी एवढ्यावरच थांबला नाही तर, त्याने आमदाराला जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली असून सायंकाळी आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी आमदार बाबाजानी दुर्राणी हे शहरातील एका अंत्यविधीच्या कार्यक्रमास गेले होते. येथे शोकाकुल वातावरणात बाकड्यावरून बसून सोबतच्या सहकाऱ्यांशी बोलत होते. यावेळी पाथरी शहरातील अजिज मोहल्ला भागातील रहिवासी असणारा मोहम्मदबीन सईदबीन किलेब हा आमदार दुर्राणी यांच्यासमोर आला. त्यावेळी त्याने अश्लील भाषेत शिवीगाळ करत दुर्राणी यांच्या कानशिलात लगावल्या. हेही वाचा-आर्यन खान प्रकरणानंतर आणखी एका प्रकरणाने समीर वानखेडेंचं टेन्शन वाढणार? आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने 'आता माझ्याकडे बंदूक असती तर तुला गोळ्या घालून ठार केलं असतं' अशा शब्दांत धमकी दिली आहे. जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून निघून गेला. ही घटना घडल्यानंतर आमदार दुर्राणी यांनी पोलीस ठाण्यात जात आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सायंकाळी पोलिसांनी संशयित आरोपी मोहम्मदबीन सईदबीन किलेब याला अटक केली आहे. हेही वाचा-उत्साहात नव्या घरात प्रवेश केला, पण पहिल्याच दिवशी कुटुंबावर दु:खाचा डोंगर आमदार दुर्राणी यांना मारहाण झाल्यानंतर, शेकडो कार्यकर्त्यांनी पाथरी पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती. मारेकऱ्यास तातडीनं अटक करून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली होती. एका आमदारास मारहाण झाल्यानं गुरुवारी दिवसभर पाथरी शहरात तणाव निर्माण झाला होता. या घटनेचा पुढील तपास पाथरी पोलीस करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: