जाहिरात
मराठी बातम्या / देश / Corona Warriors 7 वर्षांच्या लेकीला घरात कुलूप बंद करुन देशसेवा करतायेत पती-पत्नी, त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम

Corona Warriors 7 वर्षांच्या लेकीला घरात कुलूप बंद करुन देशसेवा करतायेत पती-पत्नी, त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम

Corona Warriors 7 वर्षांच्या लेकीला घरात कुलूप बंद करुन देशसेवा करतायेत पती-पत्नी, त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम

सध्याच्या परिस्थितीत कोणीच चिमुरडीला सांभाळायला येऊ शकत नाही. अशा परिस्थितीत 8 ते 9 तास ती एकटी कुलूप बंद घरात असते

  • -MIN READ
  • Last Updated :

भीलवाडा, 10 एप्रिल : देशभरात कोरोना (Coronavirus) योद्धे जीवाची पर्वा न करता कोरोना (Covid - 19) विरोधात लढाई देत आहेत. आपण कुटुंबीयांसोबत घरात सुरक्षित असताना ते मात्र घराबाहेर राहून देशाचं रक्षण करीत आहेत. यापार्श्वभूमीवर अंगावर काटा आणणारी एक घटना समोर आली आहे. राजस्थानमधील भीलवाला (Bhilwada) मॉडेल सध्या देशभरात गाजत आहे. या भागातील ही घटना आहे. भीलवाड्यातील एका कुटुंबातील तिघांचंही कोरोनाच्या लढ्यात विशेष महत्त्व आहे. या परिवारातील पत्नी पोलिसात आहे तर पती वैद्यकीय विभागात काम करतात. रॉजस्थानमधील सर्वात आधी कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या भीलवाडा शहरात राहणाऱ्या या दाम्पत्याला 7 वर्षांची मुलगीही आहे. हे दोन्ही कोरोना वॉरियर्स दिवसभर घराबाहेर राहून देशसेवा करीत असतात. तर या लहानशा चिमुरडीला घऱाला कुलूप बंद करुन ठेवतात. त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. दोघेही ड्यूटीवर असतात भीलवाड्याचे निवासी दिलखुश हे जिल्हा मुख्यालयातील महात्मा गांधी जिल्हा रुग्णालयात कंपाऊडर आहेत. दिलखूश यांची पत्नी सरोज राजस्थआन पोलिसात कॉन्स्टेबल आहे. भीलवाड्यात कोरोना संक्रमणामुळे 20 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत कर्फ्यू लावण्यात आला होता. यापुढे 13 एप्रिलपर्यंत हा कर्फ्यू असणार आहे. हे दोन्ही दाम्पत्य अशा ठिकाणी काम करतं की त्यांनी कामासाठी अधिक वेळ द्यावा लागतो. इच्छा असतानाही कुटुंबीयांची मदत नाही दिलखूश आणि सरो यांची 7 वर्षांची मुलगी दीक्षिता तिसरीत शिकते. ही चिमुरडी गेल्या 10 दिवसांपासून घरात एकटी राहते. सध्या तिला सांभाळायला कुटुंबातील कोणतीच व्यक्ती येऊ शकत नाही. त्यामुळे पती – पत्नी आणि मुलगी आपआपल्या ठिकाणी एक वेगळ्याच संकटाला तोंड देत आहेत. भीलवाडा येथील मीरा नगरमध्ये राहणारे दिलखूश रुग्णालयात सलग 10 दिवस ड्यूटीवर होते. ते घरात आले तरी मुलीला भेटू शकत नाही. कारण सलग 10 दिवस आयसोलेशन वॉर्डमध्ये काम केल्यानंतर त्यांना पुढील 10 दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागते. तर दीक्षिताची आई सरोजदेखील महाकर्फ्यूदरम्यान शहरात आपल्या टीमसोबत फिरत असताना लोकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन देत असते. ती एकदा ड्यूटीवर निघाल्यानंतर 8-9 तासांनी घरी येते. अशा परिस्थिती दीक्षिता दिवसभर घरात एकटी असते. संबंधित - लॉकडाऊन हटवताच वुहानमध्ये लगीनघाई, Matrimonial Website झाली क्रॅश पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 200 पार, आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू संपादन - मीनल गांगुर्डे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात