Home /News /maharashtra /

भिवंडीत तणाव! मोबाईलचं आमिष दाखवून नराधमानं अल्पवयीन मुलीच्या अब्रुचे तोडले लचके

भिवंडीत तणाव! मोबाईलचं आमिष दाखवून नराधमानं अल्पवयीन मुलीच्या अब्रुचे तोडले लचके

नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आरोपींच्या घरावर केली दगडफेक

 भिवंडी, 25 नोव्हेंबर: अल्पवीयन मुलीला मोबाईल व पैशांचं आमिष दाखवत तिचं अपहरण करून नराधमानं तिच्या अब्रुचे लचके तोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडीतील समरुबाग परिसरात घडली आहे. या घटनेनंतर भिवंडीत तणाव निर्माण झाला आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अपहरण, बलात्कारासह पॉक्सो कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली आहे. संतोष सोनी आणि इरशाद अन्सारी अशी आरोपींची नावं आहेत. दुसरीकडे, ही घटना वाऱ्यासारखी परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांनी दगडफेक केल्याची माहिती मिळाली आहे. हेही वाचा...6 वर्षाय चिमुरड्यानं बघितले अनैतिक संबंध, बदनामी होईल म्हणून तरुणानं काढला काटा अपहरण करून घरात डांबलं...   पीडिता राहत असलेल्या परिसरातच आरोपी संतोष सोनी याची पानटपरी आहे. यामुळेच दोघांची ओळख होती. पीडित मुलगी त्याच्या पानटपरीवर जात-येत होती. त्यातच पीडित मुलीला पैसे तसेच महागड्या मोबाईलचे आमिष दाखवत 12 नोव्हेंबर रोजी तिचे अपहरण करून आरोपीने तिला स्वतः च्या घरात कोंडून ठेवले होते. मात्र, पीडित मुलीच्या वडिलांना माहिती पडताच त्यांनी आरोपीकडे मुलीविषयी विचारणाकेली असता आरोपी संतोष तसेच इरशाद अन्सारी यांनी धमकी देत वडिलांना हाकलून लावले. त्यामुळे पीडितेच्या वडिलांनी 21 नोव्हेंबर रोजी पोलीस ठाण्यात मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हिंसक जमाव नियंत्रणात घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ मुलीचा शोध घेत मुलीला वडिलांच्या स्वाधीन केले. मात्र वैद्यकीय तपासणी केली असता मुलीसोबत अत्याचार झाल्याचे स्पष्ट झालं. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून मंगळवारी रात्रीच्या सुमारास दोघांना अटक केली आहे. तर दुसरीकडे अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार झाल्याची घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि संतप्त जमावाने जातीय रंग देऊन अफवा पसरवत आरोपींचे असलेले हॉटेल व पानटपरीवर दगडफेक करून तोडफोड केली. जवळपास अर्धा तास चाललेल्या या तोडफोडीनंतर घटनास्थळी पोलिस उपायुक्त योगेश चव्हाण आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून परिसरात तणावाचे वातावरण आहे. हेही वाचा..वांद्रे स्टेशनवर तोबा गर्दी! विना कोरोना टेस्ट केलेले 780 प्रवाशी पोहोचले मुंबईत, पाहा VIDEO बुधवारी सकाळी या परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असून दोन्ही आरोपीना बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नरेश पवार करीत आहेत. अल्पवयीन मुलगी बलात्कार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, अशी मागणी आमदार रईस शेख यांनी केली आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Bhiwandi, Crime news, Maharashtra, Mumbai

पुढील बातम्या