मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /तासाभराच्या अंतराने प्रेमीयुगुलानं सोडला प्राण; जळगावातील लव्ह स्टोरीचा हृदयद्रावक शेवट

तासाभराच्या अंतराने प्रेमीयुगुलानं सोडला प्राण; जळगावातील लव्ह स्टोरीचा हृदयद्रावक शेवट

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Minor Lovers Suicide in Jalgaon: जळगाव जिल्ह्यातील जामनेर याठिकाणी हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका प्रेमीयुगुलानं तासाभराच्या अंतराने आपल्या आयुष्याचा शेवट केली आहे.

जळगाव, 12 नोव्हेंबर: जळगाव जिल्ह्यातील जामनेर याठिकाणी हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका प्रेमीयुगुलानं तासाभराच्या अंतराने आपल्या आयुष्याचा शेवट केली (Couple commits suicide) आहे. प्रेयसीनं विष प्राशन करून आत्महत्या (Girlfriend drink poison and suicide) केल्याचा माहिती मिळताच प्रियकराने देखील आपलं जीवन संपवलं (After 1 hour boyfriend also commits suicide) आहे. एकाच दिवशी दोन अल्पवयीन तरुण-तरुणीनं अशाप्रकारे आयुष्याचा शेवट केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली नव्हती.

संबंधित घटना जामनेर तालुक्यातील कुंभारी गावातील आहे. दोन्ही प्रेमीयुगुल अल्पवयीन असून एकाच गावातील रहिवासी होते. त्याचं दोघांवर जिवापाड प्रेम होतं. दरम्यान, मंगळवारी दुपारी अचानक अल्पवयीन मुलीने आपल्या राहत्या घरात विष प्राशन करत आत्महत्या केली आहे. यावेळी संबंधित मुलगी घरी एकटीच होती. आई वडील शेतातून परत आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

हेही वाचा-रिक्षा चालकासोबत पळाली करोडपतीची बायको; पैसे संपताच घरी आली अन्...

प्रेयसीनं आत्महत्या केल्यानंतर, काही वेळातच याची माहिती अल्पवयीन प्रियकराला मिळाली. यानंतर बिथरलेल्या मुलानं तासाभराच्या आत आपल्या जीवनाचा शेवट केला आहे. संबंधित मुलानं एका शेतात जाऊन विष प्राशन करत आत्महत्या केली आहे. या युवकाचा मृतदेह शेतात रात्रभर पडून होता. बुधवारी सकाळी गावातील एका तरुणाला हा मृतदेह आढळून आला आहे.

हेही वाचा-पत्नीचा पाठलाग करत भररस्त्यात केले सपासप वार; थरारक घटनेनं मुंबई हादरली!

मंगळवारी रात्री मुलीवर तर बुधवारी सायंकाळी मुलावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे, याप्रकरणी पोलिसांत कोणतीही नोंद करण्यात आली नाही. एकाच दिवशी काही तासांच्या अंतराने अल्पवयीन प्रेमीयुगुलानं आत्महत्या केल्याने गावात खळबळ उडाली असून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. संबंधित अल्पवयीन प्रेमीयुगुलानं नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याबाबत कोणताही माहिती समोर आली नाही.

First published:
top videos

    Tags: Crime news, Jalgaon, Suicide